पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज पुणे येथे महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीमध्ये झालेल्या मुद्द्याबाबत चर्चा केली. तसेच रासपचे नेते महादेव जानकर महायुतीमध्ये आल्यानंतर त्यांना अजित पवार गट पाठिंबा देणार, बारामतीचा उमेदवार बदलणार या चर्चांवर आता अजित पवारांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.
“आजच्या पुण्यातील बैठकीत बारामती, शिरूर, सातारा, धाराशिव, नाशिक, रायगड, परभणी लोकसभा संदर्भात चर्चा झाली. परभणीचा उमेदवार दोन दिवसात ठरणार. महादेव जानकर यांना राष्ट्र्वादी पाठिंबा देणार ही केवळ अफवा असून ती विरोधकानी पसरवली आहे. कोणत्याही परिस्थितीत बारामतीचा उमेदवार बदलणार नाही”, असं अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं आहे. त्यामुळे आता बारामतीमधून महायुतीच्या तिकिटीवर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच लढणार असे अप्रत्यक्षपणे अजित पवारांनी सांगितलं आहे.
‘तिन्ही पक्षांनी एकत्रित चर्चा करुन महायुतीत जागावाटपाचे ९९ टक्के काम पूर्ण केलं आहे. २८ तारखेला मुंबईत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी पत्रकार परिषद घेऊन उमेदवार जाहीर करणार. रायगडमधून सुनील तटकरे निवडणूक लढविणार आहेत. आढळराव पाटील २० वर्षांपूर्वी आमच्या पक्षातून शिवसेनेत गेले होते. त्यांचा पक्षप्रवेश आज होणार आहे. बारामतीचा उमेदवार २८ तारखेला जाहीर करतो. तुमच्या मनातील उमेदवार जो उमेदवार आहे, तोच आमचा उमेदवार असेल.. सातारची जागा अजून जाहीर झालेली नाही’, असं अजित पवार म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Lok Sabha Election | अजितदादांच्या राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर; पुण्यात महत्वाची बैठक
-Summer | पुण्यात उष्णतेचा तडाका वाढला, पारा ४१ डिग्रीच्यावर; अशी घ्या काळजी
-बारामतीसाठी महायुतीकडून महादेव जानकरांना उमेदवारी? अजित पवारांची पुण्यात महत्वाची बैठक