पुणे : राज्यासह पुण्यातही तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. पुण्यातील आजचे तापमान ३८. २२- ४१ अंश सेल्सिअस इतके आहे. आज सकाळपासूनच उन्हाचा तीव्र कडाका जाणवू लागला आहे. येत्या चार-पाच दिवसांमध्ये आणखी २-३ अंश सेल्सिअस तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या आठवड्यापासून पुणे शहरातील उन्हाच्या झळा जाणवत आहेत. आणि तापमानात दररोज वाढ होऊ लागली आहे.
वाढत्या उष्णतेमुळे पुणेकर हैराण झाले आहेत. दिवसभर उन्हामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतच आहे मात्र रात्रीच्या हवेतही कसलाच गारवा नसून तीव्र उष्ण हवा त्रासदायक आहे. दरम्यान, पुढील ४-५ दिवसांत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये कमाल तापमानात २-३ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होईल.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर जाताना ही काळजी नक्कीच घ्या
- वाढत्या उन्हाळ्याचा विचार करता थेट सूर्यकिरणाच्या संपर्कात येणं शक्य तितकं टाळावं. नागरिकांनी उन्हात विनाकारण जास्त न फिरता आपल्या शरीराचं तापमान थंड कसं राहिल याकडे लक्ष दिले पाहिजे.
- उन्हापासून बचाव करण्यासाठी शरीरातील पाण्याचा प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी प्यावे. आपले शरीर डिहायड्रेट होणार नाही याची काळजी घ्यावी.
- कडक उन्हाळयात बाहेर जाताना आवर्जून डोक्याला स्कार्फ, टोपी असणं आवश्यक आहे. त्यासोबतच गॉगल देखील लावावा जेणेकरुन डोळ्यांना सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्रास होणार नाही.
- घराबाहेर जाताना तुमच्या जवळ ग्लुकॉन डी किंवा इलेक्ट्रॉल पावडर असणं फार गरजेचं आहे. उन्हाळ्यात चहा, कॉफी, मद्यपान, सॉफ्ट ड्रिंक्स घेणे शक्यतो टाळावे.
- घाम शोषून घेणारे कपडे वापरवे. भडक रंगाचे कपडे वापरू नयेत. हलक्या रंगाचे आणि सुती कपडे वापरावे.
- एसीमध्ये काम करणार्यांनी एसीतून बाहेर आल्यावर एकदम उकाड्यात किंवा उन्हामध्ये जाऊ नये. यामुळे गरगरल्यासारखे होते. त्यामुळे एसीतून बाहेर आल्यावर काही वेळ सावलीत बसावे मगच पुढे निघावे.
- उन्हाळ्यात बाहेर गेल्यावर चहाचे प्रमाण कमी करून कोकम, लिंबू, पन्हे अश्या सरबतांचे सेवन वाढवणे. नारळपाणी व ताक यांचे नियमित सेवन करवे.
- उन्हातून आल्यावर लगेच कुलर अथवा एसी मध्ये जाऊन बसु नये.
महत्वाच्या बातम्या-
-बारामतीसाठी महायुतीकडून महादेव जानकरांना उमेदवारी? अजित पवारांची पुण्यात महत्वाची बैठक
-पुण्यात घर खरेदीची संख्या वाढली; पुणेकरांची ‘या’ घरांना सर्वाधिक पसंती
-नर्सच्या हलगर्जीपणा नडला, रुग्णांना पोहचवलं थेट ICU मध्ये; आश्विनी जगतापांनी दिले कडक कारवाईचे आदेश
-टॉपलेस फोटोशूट : पावर्तीची भूमिका साकारणाऱ्या आकांक्षाचा टॉपलेस फोटो पोस्ट; नेटकऱ्यांची आक्रमक