इंदापूर : बारामती लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या निवडणूक लढणार आहेत. त्यांच्या विरोधात त्यांच्या भावजई म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा आहेत. तसा त्यांनी प्रचारही सुरु केला आहे. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी पवार कुटुंबातील सर्व सदस्य हे एकवटले आहेत. त्यातच अजित पवार यांच्या सख्ख्या भावाच्या पत्नी आणि शरयु फाऊंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार करताना अजित पवारांवर टीका केली आहे. सोमवारी शर्मिला पवार इंदापूर दौऱ्यावर होत्या. यावेळी शर्मिला पवार यांनी नाव न घेता अजित पवारांना टोला लगावला आहे.
“मी रवींद्रला सांगितलं चुलत्याच्या पुढं जायचं नाही. तू सरपंच, पंतप्रधान, राष्ट्रपती हो… पण शेवटी वडील ते वडील… चुलते ते चुलते… मान तो मान.. हा सन्मान प्रत्येकांनी दिला पाहिजे. येथील जनता लेचीपेची नाही. ती शरद पवारांच्या मागे खंबीरपणे उभी राहणार आहे. येत्या ४ तारखेला जनतेला कौल कुणाच्या बाजूनं आहे, हे कळेल,” असं शर्मिला पवार म्हणाल्या आहेत.
“मटण, बोकड जेवायला येण्याचं आमिष दाखवलं जाईल. पण, खावा कुणाचंही मटण दाबा फक्त, तुतारीचं बटण. नाहीतर एक वाटी रस्सा आणि पाच वर्षे मोकळंच बस्सा, असं होईल. शरद पवारांची पुण्याई सुप्रिया सुळेंच्या पाठीशी आहे. पण, कधीही सुळेंनी पवार नावाचा वापर आपल्या राजकीय कामासाठी केला नाही. निवडून द्यायचं की नाही हा जनतेचा अधिकार आहे. आज मुखात ‘श्रीराम’ म्हणतो. घराघरात रामायण आणि महाभारत सुरू आहे. मात्र, आपल्या लेकीला पुन्हा एकदा संधी द्यावी. सुप्रिया सुळेंना पुन्हा एकदा संसदेत पाठवायचं आहे,” असं देखील शर्मिला पवार म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-बारामतीसाठी महायुतीकडून महादेव जानकरांना उमेदवारी? अजित पवारांची पुण्यात महत्वाची बैठक
-पुण्यात घर खरेदीची संख्या वाढली; पुणेकरांची ‘या’ घरांना सर्वाधिक पसंती
-नर्सच्या हलगर्जीपणा नडला, रुग्णांना पोहचवलं थेट ICU मध्ये; आश्विनी जगतापांनी दिले कडक कारवाईचे आदेश
-टॉपलेस फोटोशूट : पावर्तीची भूमिका साकारणाऱ्या आकांक्षाचा टॉपलेस फोटो पोस्ट; नेटकऱ्यांची आक्रमक