पुणे : पुणे शहरातील औंध जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर, परिचारिकेच्या चुकीमुळे २ रुग्णांना अतिदक्षता विभागात उपचार घ्यावे लागले आहेत. या दोन्ही रुग्णांची प्रकृती अधिकच खालावली होती. या धक्कादायक प्रकारावरुन भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी, चिंचवडच्या आमदार आश्विनी जगताप यांनी औंध जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरला चांगलेच खडसावले आहे.
औंध रुग्णालयामध्ये रुग्णांच्या खालवलेल्या प्रकृतीबाबत माहिती मिळताच आमदार आश्विनी जगताप यांनी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णाची भेट घेत संपूर्ण घटनेची माहिती घेतली आणि हलगर्जीपणा करणाऱ्या परिचारिका आणि डॉक्टरला खडसावले. संबंधित डॉक्टर आणि परिचारिकेवर कडक कारवाई करण्याचे आदेही आश्विनी जगताप यांनी दिले आहेत.
नेमकं काय घडलं?
दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या दोन रुग्णांना परिचारिकेच्या चुकीमुळे शारिरीक त्रास सहन करावा लागला आहे. त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. दोन्ही रुग्णांना रक्त तपासून एकाला ‘ए’ पॉझिटिव्ह तर दुसऱ्या रुग्णाला ‘बी’ पॉझिटिव्ह रक्त चढवायचे होते. रक्त चढवणारी परिचारिका फोनवर बोलत असल्याने परिणामी रक्त देण्यात मोठी चूक झाली. ‘ए पॉझिटिव्ह’ रक्त हव असणाऱ्या रुग्णाला वाल्याला ‘बी पॉझिटिव्ह’ आणि ‘बी पॉझिटिव्ह’ हवं असणाऱ्या रुग्णाला ‘ए’ पॉझिटिव्ह रक्त चढवण्यात आलं.
रक्ताच्या आलटापलटीमुळे दोन्ही रुग्णांची प्रकृती इतकी खलावली होती की, रुग्णांना थेट अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करावे लागले. यावरुन आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना समजताच त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांसमोर डॉक्टरांना बोलवून घेऊन चांगलंच झापले. असे प्रकार होतातच कसे? रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणी दिला?, असे म्हणत संबंधित परिचारिकेवर कडक कारवाई करण्याचे आदेश आश्विनी जगताप यांनी औंध जिल्हा रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-टॉपलेस फोटोशूट : पावर्तीची भूमिका साकारणाऱ्या आकांक्षाचा टॉपलेस फोटो पोस्ट; नेटकऱ्यांची आक्रमक
-Loksbha Election | भाजपकडून कंगना निवडणुकीच्या मैदानात, या मतदारसंघातून देणार काँग्रेसला टक्कर
-‘सागर’वर खलबतं: ‘आधी लोकसभेचा प्रचार करा, मग…’; फडणवीसांकडून हर्षवर्धन पाटलांची कानउघणी
-Health Update | वाढत्या उष्णतेचा त्रास होतोय, मग रोजच्या जेवणात करा ‘या’ पदार्थांचा समावेश