मुंबई : होळी, धुळवजीच्या पार्श्वभूमीवर देळभरात रंगांची उधळण सुरु आहे. सर्वच जण धुळवडीच्या रंगात माखून निघाले आहेत. सिनेकलाकारांनी देखील रंगांची उधळण करत धुळवडीचा आनंद लुटत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी होळी पार्टीत जल्लोष केला. तर, काहींनी आपला मित्रपरिवार, कुटुंबासोबत होळी, धुळवड साजरी केली. रंगांनी माखलेले फोटोज अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आकांक्षाने सोशल मीडियावर टॉपलेस फोटो पोस्ट केल्याने आकांक्षावर टीकेची झोड उठवली आहे. नेटकऱ्यांनी तिच्या फोटोवर आक्रमक प्रतिक्रिया दिल्या आहेत. आकांक्षा पुरी ही छोट्या पडद्यावर ”पार्वती’ च्या भूमिकेमुळे चांगलीच लोकप्रिय आहे. छोट्या पडद्यावरील पार्वतीची भूमिका साकारणारी आकांक्षा पुरीवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
View this post on Instagram
‘विघ्नहर्ता गणेश’ या मालिकेत आकांक्षाने पार्वतीची भूमिका साकारली होती. आकांक्षाने पुरीने इन्स्टाग्राम अकाउंटवर आपला टॉपलेस फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तिने ‘गुलाल हो…तो लाल हो…तुमचा आवडीचा रंग कोणता?’ असं कॅप्शन देत आपल्या चाहत्यांना तिने प्रश्न विचारला आहे.
View this post on Instagram
एका नेटकऱ्याने ‘आता तुझे समाधान झाले असेल, तुझ्या या फोटोला मनासारखे लाईक्स आले असतील’, असे म्हटले आहे. ‘तुझे शरीर आहे, त्यावर तुझा अधिकार आहे. पण, किमान आज उत्सवाच्या दिवशी तरी नको’, असेही एका नेटकऱ्यांने म्हटले आहे. तर, काही युजर्सने या फोटोशूटमुळे ‘आम्ही तुला अनफॉलो करत आहे’, ‘किमान आजच्या दिवशी तरी हा फोटो टाळता आला असता’ ‘हे काय झाले, तू तर माँ पार्वती आहे’, असं म्हणत फोलोवर्स कमी झाल्याचंही पहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Loksbha Election | भाजपकडून कंगना निवडणुकीच्या मैदानात, या मतदारसंघातून देणार काँग्रेसला टक्कर
-‘सागर’वर खलबतं: ‘आधी लोकसभेचा प्रचार करा, मग…’; फडणवीसांकडून हर्षवर्धन पाटलांची कानउघणी
-Health Update | वाढत्या उष्णतेचा त्रास होतोय, मग रोजच्या जेवणात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
-बारामतीमध्ये अजित पवारांना शिंदेंच्या शिवसेनेचाही विरोध; व्हाट्सअप स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात खळबळ