मुंबई : येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या उमेदावारांच्या ५ याद्या जाहीर केल्या आहेत. भाजपने जाहीर केलेल्या पाचव्या यादीमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री कंगणा रणौत हिचे नाव जाहीर करण्यात आले आहे. कंगणा रणौतला भाजपने हिमाचल प्रदेशमधील मंडी या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.
अभिनेत्री कंगना रणौत हिने सोशल मीडियावर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मी भारतीय जनता पक्षाला नेहमी बिनशर्त पाठिंबा दिली आहे. आज पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने मला माझं जन्मस्थान असलेल्या मंडीमधून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर केली. हा माझा सन्मान असून यामुळे मला खूप आनंद झाला आहे. धन्यवाद”, असं म्हणत कंगना रणौतने भाजपचे आभार मानले आहेत.
कंगना रणौत हिने आजपर्यंत भाजपच्या समर्थनार्थ वक्तव्य केली आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सत्तेत असताना तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कंगनाने जोरदार टीका केली होती. त्याचबरोबर अनेकदा कंगनाने वादग्रस्त वक्तव्यही केली आहेत. ज्यामुळे कंगना रणौत नेहमीच चर्चेत रहिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘सागर’वर खलबतं: ‘आधी लोकसभेचा प्रचार करा, मग…’; फडणवीसांकडून हर्षवर्धन पाटलांची कानउघणी
-Health Update | वाढत्या उष्णतेचा त्रास होतोय, मग रोजच्या जेवणात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
-बारामतीमध्ये अजित पवारांना शिंदेंच्या शिवसेनेचाही विरोध; व्हाट्सअप स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
-फडणवीसांची भेट अन् मुळीक लागले मोहोळांच्या प्रचाराला! वडगावशेरीत भाजपचं गणित जुळलं
-“आढळराव पाटलांना बदला घ्यायचाय, पण मी मायबाप जनतेकडे आशिर्वाद मागतोय”