बारामती : राज्यात सर्वाधिक चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ. या निवडणुकीत यंदा वेगळीच रंगत दिसत आहे. महायुतीतील नेत्यांनीच एकमेकांविरोधात दंड थोपटल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. माजी आमदार विजय शिवतारे यांनी विजय शिवतारे यांच्या अपक्ष निवडणूक लढवण्याने अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यातच ‘इंदापूरमधून विधानसभेचा शब्द घेतल्याशिवाय लोकसभेचे काम करणार नाही’, असा पवित्रा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घेतला आहे. यावरुन बारामती मतदारसंघात मोठा वाद निर्माण झाला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बारामतीमधील हा वाद मिटवण्यासाठी महत्वाची बैठक पार पडली. फडणवीस यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. फडणवीसांनी हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत रात्री उशिरापर्यंत चर्चा केली. त्यानंतर फडणवीसांनी अजित पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचंही समोर आलं आहे.
पुढील आठवड्यात इंदापूरमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्याच्या सूचना फडणवीसांनी हर्षवर्धन पाटलांना दिल्या आहेत. इंदापूरमध्ये आयोजित केलेल्या या मेळाव्यामध्ये हर्षवर्धन पाटील, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, हे नेते येऊन एकत्रित कार्यकर्त्यांशी संवाद साधून संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
दरम्यान, राज्यातील पश्चिम महाराष्ट्रासह बारामती लोकसभेचा प्रचाराची धुरा महायुतीने हर्षवर्धन पाटील यांच्या हाती दिली आहे. त्यामुळे पुढील कालावधीमध्ये हर्षवर्धन पाटील बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा प्रचार करताना दिसतील. फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीनंतर हर्षवर्धन पाटील हे महायुतीच्या प्रचारासाठी सज्ज झाल्याचं पहायला मिळालं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांना समजदेखील दिल्याचं बोललं जात आहे. “विधानसभेसंदर्भात निर्णय वेळ आल्यावर घेऊ. आता लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करा,” असे आदेश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Health Update | वाढत्या उष्णतेचा त्रास होतोय, मग रोजच्या जेवणात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
-बारामतीमध्ये अजित पवारांना शिंदेंच्या शिवसेनेचाही विरोध; व्हाट्सअप स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
-फडणवीसांची भेट अन् मुळीक लागले मोहोळांच्या प्रचाराला! वडगावशेरीत भाजपचं गणित जुळलं
-“आढळराव पाटलांना बदला घ्यायचाय, पण मी मायबाप जनतेकडे आशिर्वाद मागतोय”