Health Update : सध्या उन्हाळ्याच्या झळा खूप लवकर जाणवू लागल्या आहेत. साधारणपणे होळी या सणानंतर उन्हाळ्याचा कडाका वाढत असतो मात्र यावेळी उन्हाळ्याच्या झळा जाणवत आहेत. या वाढत्या उन्हामुळे अनेकांना समस्यांना सामना करावा लागतो. अशी स्थिती टाळण्यासाठी आहारात अशा काही पदार्थांचा समावेश केला पाहिजे. ज्यामुळे तुमचे शरीर थंड आणि निरोगी राहिलं आणि उष्णतेचा तुमच्यावर प्रभाव पडणार नाही.
ऋतू बदलले की आपल्या शरिरावर परिणाम झालेले दिसून येतात. जसे ऋतू बदलतात तसे आपल्या आहारही बदल करायला हवा. प्रत्येक मौसमामध्ये विविध प्रकारचा आहार घेणं आपल्या शरिरासाठी फायदेशीर तर ठरतंच पण आपले शारिरीक स्वास्थही चांगले राहते. आपल्या रोजच्या जीवनात पोळी-भाजीचा समावेश असू द्यावा.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण आपल्या आहारात पातळ भाज्या, गाजर, काकडी यांसारख्या फळांचाही समावेश असावा. तसंच जेवताना तुम्ही दही देखील खाऊ शकता. यामुळे तुमच्या शरिराचं तापमान कमी होण्यास मदत होईल. उन्हाळ्यात ताकाचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. असे म्हंटले जाते नियमित ताक प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच अनेकआश्चर्यकारक फायदे देखील होतात.
उन्हाळ्यात एक ग्लास ताक प्यायल्याने ताजेतवाने वाटते. उन्हाळ्यात ताक हा आरोग्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. उन्हाळ्यात नियमित ताक प्यायल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते आणि आजारांचा धोकाही कमी होतो. आयुर्वेदातही ताक हे आरोग्यासाठी वरदान मानले जाते.
ताक प्यायल्याने तुमच्या शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. ताकामध्ये रिबोफ्लेविन नावाचे बी व्हिटॅमिन असते, जे तुमच्या शरीराला ऊर्जा उत्पादनात मदत करते. थकवा जाणवत असेल तर ताक अवश्य सेवन करा. हे तुम्हाला उत्साही राहण्यास मदत करेल. उन्हाळ्याच्या दिवसात शरिरात पाण्याची कमतरता जाणवू शकते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणीदार फळांचा जेवणात समावेश करा. कलिंगड, खरबूज, द्राक्षे या सारखी फळं रोज खाण्यात यावीत.
महत्वाच्या बातम्या-
-बारामतीमध्ये अजित पवारांना शिंदेंच्या शिवसेनेचाही विरोध; व्हाट्सअप स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
-फडणवीसांची भेट अन् मुळीक लागले मोहोळांच्या प्रचाराला! वडगावशेरीत भाजपचं गणित जुळलं
-“आढळराव पाटलांना बदला घ्यायचाय, पण मी मायबाप जनतेकडे आशिर्वाद मागतोय”
-लाल मातीतला पैलवान दिल्लीत पाठवायचाय! मोहोळांसाठी हजारो पैलवानांची फौज प्रचाराच्या मैदानात