पुणे : महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक चर्चेतला मतदारसंघ म्हणून बारामती मतदारसंघाकडे पाहिलं जातं. बारामतीमध्ये सध्याच्या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार सामना रंगणार आहे. अजित पवार यांनी भापजपसोबत गेल्याने राष्ट्रवादीचे २ गट पडले शिवाय पवार कुटुंबातील सर्व सदस्य देखील शरद पवारांच्या सोबत आहेत. अजित पवार यांना या निवडणुकीत त्यांचे कट्टर राजकीय विरोधक शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी दंड थोपटले आहे. बारामतीमधून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे अजित पवारांना बारामतीची निवडणूक लढवणं सोपी राहिली नाही.
बारामती लोकसभा मतदार संघातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची महायुतीकडून उमेदवारी निश्चित झाली आहे. महाविकास आघाडीकडून खासदार सुप्रिया सुळे उमेदवार आहेत. अजित पवारांच्या विरोधात संपूर्ण पवार कुटुंब एकवटलं आहे. त्यातच शिवतारे यांनी रविवारी अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विजय शिवतारे यांनी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी समजावून सांगितले मात्र तरीही विजय शिवतारे बारामतीमधून निवडणूक लढण्यावर ठाम आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून अजित पवार यांना विरोध सुरु झाला आहे. खडकवासला विधानसभा मतदार संघात सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत एक मेसेज व्हायरल होत आहे.
‘खडकवासला विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेला विचारात घेत नसल्याने शिवसैनिक नाराज आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रचार करायचा नसून पुणे लोकसभेतील मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार करू या’, असा मेजसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांना येत आहे. हा मेसेज शिवसेनेच्या एकास व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल झाला आहे. या मेसेजवरुन राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान , अजित पवार यांच्या त्यांचेच कुटुंब विरोधात आहेत. त्यातच आता अजित पवारांना महायुतीच्या पक्षांकडूनही अजित पवारांना विरोध होताना दिसत आहे. त्यामुळे अजित पवारांच्या पवारांच्या अडचणीत वाढ होत असल्याचं दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-फडणवीसांची भेट अन् मुळीक लागले मोहोळांच्या प्रचाराला! वडगावशेरीत भाजपचं गणित जुळलं
-“आढळराव पाटलांना बदला घ्यायचाय, पण मी मायबाप जनतेकडे आशिर्वाद मागतोय”
-लाल मातीतला पैलवान दिल्लीत पाठवायचाय! मोहोळांसाठी हजारो पैलवानांची फौज प्रचाराच्या मैदानात
-‘आगामी काळात विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम होणार’; सुप्रिया सुळेंची इंदापुरातली सभा तुफान गाजली