पुणे : राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या मतदारसंघापैकी बारामतीनंतर शिरुर लोकसभा मतदारसंघाचं नाव घेतलं जातं. शिरुर लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील पुन्हा निवडणूक लढणार असल्याच बोललं जात आहे.
२०१९ च्या शिरुर लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटलांचा पराभव केला होता. आढळराव पाटलांचा पराभव केल्यानंतर आढळरावांना पराभव पचला नाही. त्यामुळे आढळारावांनी शिरुरची यंदाची निवडणूक लढवण्याची इच्छा लावूनच धरली आहे. आढळराव पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रावादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आढळारावांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
‘गेल्या वेळचा बदला घेण्यासाठीच आपण निवडणुकीला उभे राहणार असून यावेळी निवडून येणार याची १०० टक्के खात्री आहे. ही निवडणूक हे सर्व रेकॉर्ड तोडणारी असेल’, असे शिवाजीराव आढळराव पाटलांनी म्हणाले होते. यावर खासदार अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“२०१९ सालचा बदला घेण्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडणूक लढणार असतील तर एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाने लोकसभेत जाऊच नये का? का फक्त परदेशात कंपन्या असणाऱ्यांच्याच माणसाला लोकसभेत जाण्याचा अधिकार आहे? निवडणुकीला सामोरे जाण्याचा कोणाचा काय हेतू आहे, हे स्पष्ट होतो आहे.”
“त्यांचे विधान पाहिले तर त्यांना २०१९ चा बदला घ्यायचा आहे. मला मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, सर्वसामान्य नागरिकांचा, महाराष्ट्रातील जनतेचा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आवाज हा दिल्लीत घुमत राहावा यासाठी मायबाप जनतेकडे मी आशिर्वाद मागतोय. त्यासाठी मी या निवडणुकीत उभा आहे. त्यांना जर बदला वाटत असेल तर मायबाप जनता सुज्ञ आहे”, असे अमोल केल्हे म्हणाले आहेत.
“कोणी महायुतीत जाणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण यापद्धतीने जे प्रकार सुरु आहेत. त्यामध्ये भाजपचा कॉन्फिडन्स खचलेला दिसतोय”, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत. मसने अध्यक्ष राज ठाकरे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. राज ठाकरेंची मनसे भाजपसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. यावर बोलताना अमोल कोल्हे यांनी भाजपच्या कॉन्फिडन्सबाबत भाष्य केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-लाल मातीतला पैलवान दिल्लीत पाठवायचाय! मोहोळांसाठी हजारो पैलवानांची फौज प्रचाराच्या मैदानात
-‘आगामी काळात विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम होणार’; सुप्रिया सुळेंची इंदापुरातली सभा तुफान गाजली
-आढळराव पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार; नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘त्यांनी आत्पधर्म म्हणून..’
-मावळात महायुतीचा तिढा काही सुटेना; बारणेंना विरोध, भेगडेंनंतर आता जगताप यांच्या उमेदवारीची मागणी