पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय कट्टर विरोधक असणारे शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप करत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. त्यांच्या या टीकेवरुन आता अजित पवार गटानेही आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी विजय शिवतारे यांच्यावर टीका केली आहे.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगूनही माजी मंत्री विजय शिवतारे यांचे शेपूट सरळ झालेले नाही, त्यामुळे आता त्यांचे शेपूट छाटण्याची वेळ आली आहे. विजय शिवतारे यांचे व्यक्तिगत आयुष्य आणि इतर बाबी इतक्या खालच्या स्तराच्या आहेत. त्या चव्हाट्यावर आल्यामुळे शिवतारे यांचे व्यक्तिमत्त्व काय लायकीचे आहे, हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसमोर आले आहे. त्यामुळे त्यांना इतरांची लायकी तपासण्याचा अधिकार नाही”, असं म्हणत उमेश पाटील यांनी शिवतारे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्यावर टीका केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना समजावून सांगितले होते. ‘आपण महायुतीमध्ये असल्याने युतीचा धर्म पाळा’, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंना केल्या होत्या मात्र तरीही विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर टीका करण्याचं सत्र सुरुच ठेवले. यावर उमेश पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगूनही शिवतारे यांचे शेपूट सरळ झालेले नाही, त्यामुळे त्यांचे शेपूट छाटण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्र्यांनी आता विजय शिवतारे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची शिवसेनेतून तत्काळ हकालपट्टी करावी.”
महत्वाच्या बातम्या-
-लाल मातीतला पैलवान दिल्लीत पाठवायचाय! मोहोळांसाठी हजारो पैलवानांची फौज प्रचाराच्या मैदानात
-‘आगामी काळात विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम होणार’; सुप्रिया सुळेंची इंदापुरातली सभा तुफान गाजली
-आढळराव पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार; नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘त्यांनी आत्पधर्म म्हणून..’
-मावळात महायुतीचा तिढा काही सुटेना; बारणेंना विरोध, भेगडेंनंतर आता जगताप यांच्या उमेदवारीची मागणी
-आढळराव पाटलांच ठरलं! 26 तारखेला होणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश