पुणे : राज्यातील लोकसभा मतदारसंघापैकी बारामती लोकसभेची निवडणूक यंदा अधिक चुरशीची होणार आहे. पहिल्यांदाच पवार कुटुंबातील २ सदस्य एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बारामतीमध्ये महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुप्रिया सुळे या संपूर्ण मतदारसंंघ पिंजून काढत आहेत. आपल्या मतदारसंघात प्रचार करताना दिसत आहेत. आज शनिवारी बारामतीतील इंदापुरात महाविकास आघाडीची सभा पार पडली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर सडकून टीका केल्याचं पहायला मिळालं आहे.
“रोहित पवार, युगेंद्र पवार हे माझा प्रचार करत आहेत. ते आजोबा शरद पवार यांच्यासोबत उभे राहिले आहेत. युगेंद्र पवार यांचा दोन वेळा रस्ता अडवण्यात आला. ते लोकशाही पद्धतीने शांततेने प्रचार करत आहेत. मी युगेंद्र पवार यांच्या सुरक्षेची मागणी केली. त्यानंतर माझ्यावरही टीका झाली. कुठल्याही मुलावर हल्ला झाल्यावर त्या आईचा कोणी विचार करणार की नाही? टीका करताना पातळी सोडली जात आहे. हे काय संस्कार आहेत का?” असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 23, 2024
“दमदाटी केली जात आहे. पवार साहेबांच्या सभेला जाऊ नका, असंही सांगत आहेत. पण मला सांगायचं आहे की, हा इंदापूर तालुका आहे. इथे शरद पवारांवर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे. इथले लोक फोनला, धमक्यांना घाबरणार नाहीत. विरोधकांनी त्यांचाच विचार करावा. कारण त्यांचा विधानसभेत करेक्ट कार्यक्रम होणार आहे. आगामी काळात इंदापूरकर विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करतील”, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आढळराव पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार; नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘त्यांनी आत्पधर्म म्हणून..’
-मावळात महायुतीचा तिढा काही सुटेना; बारणेंना विरोध, भेगडेंनंतर आता जगताप यांच्या उमेदवारीची मागणी
-आढळराव पाटलांच ठरलं! 26 तारखेला होणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
-Baramati Lok Sabha Election | शिवतारेंचं ठरलं; अजित पवारांच्या ‘या’ कट्टर विरोधकाची घेणार भेट
-मोठी बातमी! “त्यांना अडचण होतेय म्हणून बाहेर पडतोय”; शिवतारे शिवसेना सोडणार?