पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष जोमाने तयारी करत आहेत. सर्वाधिक चर्चेच्या मतदारसंघामध्ये बारामतीनंतर शिरुर लोकसभा मतदारसंघाकडे पाहिलं जात. शिरुरमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे हे निवडणूक लढणार आहेत. शिरुर लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून कोण उमेदवार द्यायचा, याबाबत अद्यापही चर्चा सुरू आहे.
शिवसेनेचे नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून शिरुर लोकसभा निवडणूक लढविणार अशी चर्चा सुरू आहे. यावरुन आता शिवसेनेच्या नेत्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याबाबत भाष्य केले आहे.
“मागील अनेक वर्षांपासून शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरुर लोकसभा मतदारसंघात काम करणारे नेते आहेत. आम्ही सर्वांनी बरोबरीने काम केले आहे आणि करीत आहोत, पण त्यांनी काय निर्णय घेतला आहे. त्याबाबत जोपर्यंत स्पष्टपणे माहिती समोर येत नाही. तोपर्यंत याबाबात कोणतंही भाष्य करणं योग्य नाही. परंतु अचानकपणे घडलेली राजकीय युतीची समीकरणे एखाद्या व्यक्तीला असे निर्णय घेण्यास भाग पडू शकते. मात्र शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आप्तधर्म म्हणून निर्णय तो घेतला असेल तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या नेत्यांनी मिळूनच असे निर्णय घेतलेले असू शकतात. शिवाजीराव आढळराव पाटील यांचं या मतदार संघातील काम लक्षात घेता ते निश्चितच निवडून येतील.”
दरम्यान, बारामती मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेणारे शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनाही नीलम गोऱ्हे यांनी मोलाचा सल्ला दिला आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्पष्टीकरण आणि मार्गदर्शनामुळे विजय शिवतारे यांचे नक्कीच समाधान होईल. पण प्रत्येकाने पक्ष शिस्त ही पाळलीच पाहिजे. अशी जाहीर विधान करणे योग्य होणार नाही. विजय शिवतारे यांच्यावर कारवाई होण्यापूर्वीच त्यांनी मध्यम मार्ग स्विकारला पाहिजे” असा सल्ला यावेळी नीलम गोऱ्हेंनी शिवतारे यांना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मावळात महायुतीचा तिढा काही सुटेना; बारणेंना विरोध, भेगडेंनंतर आता जगताप यांच्या उमेदवारीची मागणी
-आढळराव पाटलांच ठरलं! 26 तारखेला होणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
-Baramati Lok Sabha Election | शिवतारेंचं ठरलं; अजित पवारांच्या ‘या’ कट्टर विरोधकाची घेणार भेट
-मोठी बातमी! “त्यांना अडचण होतेय म्हणून बाहेर पडतोय”; शिवतारे शिवसेना सोडणार?