पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये खासदार अमोल कोल्हे यांना शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर महायुतीकडून कोण लढणार हा सस्पेन्स आजवर कायम होता. आता शिवसेना शिंदे गटामध्ये असणारे शिवाजीराव आढळराव पाटील हेच महायुतीकडून लढणार असल्याचं निश्चित झालं आहे. आज त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली, यावेळी २६ मार्च रोजी मतदारसंघात मोठा मेळावा घेत ते राष्ट्रवादी काँग्रेसने प्रवेश करणार असल्याचं निश्चित झाल आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा महायुतीमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार आहे. तीन वेळा शिरूरचे खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव पाटील सद्या शिवसेनेमध्ये आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेत उमेदवारी दिली जाणार असल्याचं आता निश्चित झाल आहे. आज अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली. यावेळी २६ मार्च रोजी मतदारसंघात मोठा मेळावा घेत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आढळराव पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून मतदारसंघातील जनतेच्या साक्षीने मंगळवारी मेळावा पार पडणार आहे. काही नसताना पहिली निवडणूक ३० हजारांच्या मताधिक्याने तर दुसरी १ लाख ८० हजाराने तर तिसरी ३ लाख ३ हजारांनी विजय झाला. यंदाच्या निवडणुकीतील विजय त्यापेक्षा अधिक मताधिक्याने होईल.
महत्वाच्या बातम्या-
-Baramati Lok Sabha Election | शिवतारेंचं ठरलं; अजित पवारांच्या ‘या’ कट्टर विरोधकाची घेणार भेट
-मोठी बातमी! “त्यांना अडचण होतेय म्हणून बाहेर पडतोय”; शिवतारे शिवसेना सोडणार?
-“माहेरवाशीणची नेहमी खणा-नारळाने ओटी भरतो, आता आपल्याला मुलीचा मान ठेवायचाय”
-निवडणूक जिंकण्यासाठी मोदी सरकारचा रडीचा डाव, हीच का ती लोकशाही?; पृथ्वीराज चव्हाण आक्रमक