बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकारणातील कट्टर विरोधक असणारे शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले आहे. शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीत असतानाही महायुतीच्याच उमेदवार म्हणून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजावून सांगितलं तरीही शिवतारे यांनी निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं सांगितलं आहे. त्यातच शिवतारे यांना महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्यास ते भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
बारामती मतदारसंघातील इंदापूर विधानसभेचे माजी आमदार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटलांची भेट घेणार असल्याचं विजय शिवतारे यांनी जाहीर केलं. हर्षवर्धन पाटील हे देखील अजित पवारांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव करून त्या ठिकाणी त्यांचे विश्वासू असलेल्या दत्तात्रय भरणे यांना निवडून आणलं होतं.
दत्तात्रय भरणे यांना अजित पवारांनी निवडणून आणलं. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे अजित पवारांवर नाराज आहेत. त्यातच आता शिवतारे यांनी हर्षवर्धन पाटलांची भेट घेणार आहेत. आता हर्षवर्धन पाटलांच्या नाराजीचा फायदा विजय शिवतारे घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.
“मी उमेदवारी जाहीर केल्यानंतर लोक खुश आहेत. अनेक वर्षे ती दाबून राहिली आहेत. बिहारमध्ये जशी परिस्थिती आहे तशी परिस्थिती बारामती लोकसभा मतदारसंघात आहे. अजित पवारांनी या ठिकाणी नेक्सस तयार केलं आहे, गुंडांकडून दम दिला जातोय. त्यामुळे दोन्ही पवार आता नको असं लोकांचं मत आहे. माझा विरोध हा वैयक्तिक नसून पवार या प्रवृत्तीला आहे”, असं विजय शिवतारे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-मोठी बातमी! “त्यांना अडचण होतेय म्हणून बाहेर पडतोय”; शिवतारे शिवसेना सोडणार?
-“माहेरवाशीणची नेहमी खणा-नारळाने ओटी भरतो, आता आपल्याला मुलीचा मान ठेवायचाय”
-निवडणूक जिंकण्यासाठी मोदी सरकारचा रडीचा डाव, हीच का ती लोकशाही?; पृथ्वीराज चव्हाण आक्रमक
-“माझ्या विरोधात प्रीतम मुंडे असो की पंकजा मुंडे, पक्षाने सांगितलं तर लढणार अन् जिंकणार”