बारामती : राज्यात सर्वाधिक हॉट्सपॉट मानला जाणारा मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ. बारामतीमध्ये यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची बनलेली आहे. कारण राजकीय इतिहासात प्रथमच पवार विरुद्ध पवार असा सामना पहायला मिळत आहे. पवार कुटुंबात मोठी फूट पडल्याने पवार घराचे २ तुकडे झाल्याचं पहायला मिळतंय.
बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात हा सामना रंगणार आहे. अजित पवार यांच्याविरोधात त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार हे राजकीय मैदानात उतरल्याचं चित्र पहायला मिळालं. त्यातच आता सुप्रिया सुळे यांच्या प्रचारावेळी पुरंदर तालुक्यात शरयु फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीनिवास यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी निवडणूक आणि सद्याची राजकीय परिस्थीती याबाबत आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत.
“कोणीही जिंकले तरी आनंद नाही”
“सध्याची लोकसभेची निवडणूक ही आम्हा पवार कुटुंबीयासाठी अत्यंत दुःखदायक असून, या निवडणुकीत विजय कोणाची ही झाला तरी आनंद नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आपण केलेल्या कामाचा कधीही गवागवा केलेला नाही. मात्र, काही लोक काम न करता फक्त गवगवाच करतात. आपल्या सुप्रिया सुळे यांची कामगिरी अत्यंत दमदार आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा आपण सर्वांनी मिळून संसदेत पाठवायचे आहे”,असं शर्मिला पवार म्हणाल्या आहेत.
माहेरवाशीणला आपण नेहमी खणा-नारळाने ओटी भरून पाठवतो. आपली माहेरवाशीण सुप्रिया सुळे यांची कामगिरी दमदार आहे, त्यामुळे आपण आपल्या मुलीचा मान ठेवायचा की पराभूत करायचे, हे तुम्ही ठरवायचे आहे, असे सांगून शर्मिला पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा निवडून देण्याचे भावनीक आवाहन केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-निवडणूक जिंकण्यासाठी मोदी सरकारचा रडीचा डाव, हीच का ती लोकशाही?; पृथ्वीराज चव्हाण आक्रमक
-“माझ्या विरोधात प्रीतम मुंडे असो की पंकजा मुंडे, पक्षाने सांगितलं तर लढणार अन् जिंकणार”
-Baramati Lok Sabha: लेकीसाठी ‘बापमाणूस’ मैदानात; कार्यकर्त्याने बनवली चक्क चांदीची टोपी
-वेळ पडल्यास भाजपच्या चिन्हावर लढेन; शिवतारे बारामतीतून लढण्यावर कायम, पक्षाकडून कारवाईची शक्यता
-‘रोहित, युगेंद्र पवारांवर दडपशाही होतेय, त्यांना सुरक्षा पुरवावी’; सुप्रिया सुळेंची मागणी