पुणे : देशात लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. मात्र अद्यापही काही पक्षांकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. सध्या शरद पवार गटाने महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर केले नाहीत. राज्यातील विविध मतदारसंघातून अनेक जण निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. बीड लोकसभा मतदारसंघातून ज्योती मेटे आणि बजरंग सोनवणे यांच्या नावाची चर्चा आहे.
‘पक्षाने जबाबदारी दिल्यास मी निवडणूक लढणार आणि निवडणूक जिंकेलही, असा विश्वास बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला आहे. ते आळंदीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बजरंग सोनवणे यांनी २०१९ ला झालेल्या बीड लोकसभेत प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी बजरंग सोनवणे यांना पराभव पत्कारावा लागला होता.
भाजपच्या प्रीतम मुंडे यांनी त्यांचा पराभव केला होता. आता पुन्हा एकदा बजरंग सोनवणे हे प्रीतम मुंडे यांच्या मोठ्या भगिनी भाजपकडून बीडमधून लढणार आहेत. त्यामुळे बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्या विरोधात लढण्याची शक्यता आहे.
“माझ्या विरोधात प्रीतम मुंडे असो की पंकजा मुंडे, मला काही अडचण नाही, असे पक्षाने जबाबदारी दिली तर बीड लोकसभा लढणार आणि जिंकणार”, असा आत्मविश्वास बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Baramati Lok Sabha: लेकीसाठी ‘बापमाणूस’ मैदानात; कार्यकर्त्याने बनवली चक्क चांदीची टोपी
-वेळ पडल्यास भाजपच्या चिन्हावर लढेन; शिवतारे बारामतीतून लढण्यावर कायम, पक्षाकडून कारवाईची शक्यता
-‘रोहित, युगेंद्र पवारांवर दडपशाही होतेय, त्यांना सुरक्षा पुरवावी’; सुप्रिया सुळेंची मागणी
-धंगेकरांना उमेदवारी, वसंत मोरेंचं व्हॉट्स अॅप स्टेटस चर्चेत; ‘एकदा ठरलं की ठरलं’