बारामती : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रचारचीही रणधुमाळी राज्यभरात सुरु आहे. सर्व पक्ष संपूर्ण ताकदीने आपापल्या परीने आपल्या उमेदवारांची प्रचार करताना दिसत आहेत. राज्यातील सर्वात चर्चेच्या मतदारसंंघात म्हणजे बारामती मतदारसंघामध्ये खासदार शरद पवारांच्या कार्यकर्त्यानी प्रचाराचा कहरच केला. खासदार सुप्रिया सुळे यांचा म्हणजेच तुतारी चिन्हाचा प्रचार करण्यासाठी या कार्यकर्त्यांने चक्क चांदीची टोपी बनवून घेतली आहे. या खंद्या कार्यकर्त्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे. त्याने शरद पवार यांच्या पक्षाचे चिन्ह सर्व लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे.
गणेश नवले असं चांदीची टोपी बनवलेल्या शरद पवार यांच्या या कार्यकर्त्याचे नाव आहे. मूळचे बारातमीचे असणारे गणेश नवले हे मतदारसंघात सुप्रिया सुळेंचा प्रचार करताना दिसत आहेत. ‘आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी स्वत:ला झोकून देऊन काम करा. प्रचार करा’, असे वरिष्ठांकडून सांगितले जात आहे. त्याचेच पालन कार्यकर्ते करताना दिसत आहेत.
गणेश नवले यांनी देखील वरिष्ठांच्या सूचनेचं पालन करताना शरद पवार यांच्या पक्षाचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी चक्क अर्धा किलो चांदीची टोपी तयार केली आहे. नवले यांच्या टोपीवर एका बाजूला ‘पवार साहेब’ आणि दुसऱ्या बाजूला ‘ताईसाहेब’ असं लिहिलेलं आहे. शरद पवार यांच्या पक्षाचे तुतारी हे चिन्हदेखील या टोपीवर कोरण्यात आले आहे. नवले ही टोपी डोक्यावर घालून सुप्रिया सुळेंचा प्रचार करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-वेळ पडल्यास भाजपच्या चिन्हावर लढेन; शिवतारे बारामतीतून लढण्यावर कायम, पक्षाकडून कारवाईची शक्यता
-‘रोहित, युगेंद्र पवारांवर दडपशाही होतेय, त्यांना सुरक्षा पुरवावी’; सुप्रिया सुळेंची मागणी
-धंगेकरांना उमेदवारी, वसंत मोरेंचं व्हॉट्स अॅप स्टेटस चर्चेत; ‘एकदा ठरलं की ठरलं’
-‘पुण्याच्या सेवेसाठी मुरलीधर मोहोळ हक्काचे खासदार असतील’; पंकजा मुंडेंचा विश्वास