पुणे : देशात लोकसभा निवडणूक जाहीर झाल्या आहेत. पुण्यातून भाजपने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केली असून आज माजी मंत्री आणि बीड मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी मोहोळ यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना आपल्याला निवडणूक लढवणे अवघड नाही, पक्षाने आदेश दिल्यास राज्यभरात प्रचार करणार असल्याचं मुंडे म्हणाल्या.
“लोकसभेच्या निमित्ताने मी बीड जिल्ह्यात जात असताना रस्त्यात येणाऱ्या सर्व मतदारसंघात भेट देत आहे. पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना मोठ्या बहिणीच्या नात्याने शुभेच्छा देण्यासाठी आले. त्यांना मोठा विजय प्राप्त व्हावा आणि पुण्याचा सेवेसाठी एक हक्काचा खासदार म्हणून त्यांनी दिल्लीमध्ये जावो” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
बीडमधून शिवसंग्रामचे अध्यक्ष दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असल्याचा प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारला असता, “माझे सर्वसमावेशक धोरण राहिल्यामुळे निवडणुकीत मी समोरच्या उमेदवाराला विरोधी पक्षाचा उमेदवार म्हणूनच पाहते, मी त्याला कोणत्या जातीचा उमेदवार म्हणून कधी पाहत नाही तसेच तेही पाहणार नाहीत, अशी अपेक्षा ठेवते” असं मुंडे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या-
-“विरोधकांना शिव्याशाप देऊ नका”; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या सूचना
-‘एक आमदार असणाऱ्या पक्षासाठी भाजप पायघड्या घालतंय’; रोहित पवारांचा भाजपला टोला
-Pune Loksabhe Election: ‘खासदार तर मीच होणार..’; वसंत मोरेंचा आत्मविश्वास
-मावळमध्ये महायुतीचा तिढा कायम; ‘बारणेंना उमेदवारी दिली तर आम्ही प्रचार करणार नाही’
-महायुतीत वादाची ठिणगी “शिवतारेंना आवरा, त्यांच्यामुळे महायुतीतील वातावरण खराब होतंय”