पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी विरोधकांमध्ये तुफान कलगितुरा रंगला आहे. त्यातच ‘अबकी बार ४०० पार’, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपकडून व्यक्त केला जात आहे. मोदींचा विश्वास सार्थ करण्यासाठी भाजप नेते कामाला लागले आहेत. महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा रिपब्लिकन गट यापाठोपाठ भाजपने मनसेलाही सोबत घेण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
“भाजप पराभवाच्या भीतीपोटी आता छोटे-छोटे मित्रपक्ष जोडत आहे. एकीकडे ४०-४० आमदार असलेल्या फुटीर गटांना जागावाटपाच्या वाटाघाटी करताना हवे ते मिळत नाही, तर दुसरीकडे एक- एक आमदार असलेल्या छोट्या पक्षांना मात्र भाजप पायघड्या अंथरत आहे. या छोट्या पक्षांकडे बघून अल्पावधीतच आधीच शिकार झालेले मोठे पक्ष ‘नया है वह’ असेच म्हणत असतील,” असा टोला रोहित पवारांनी भाजपला लगावला आहे.
आज देशभरात भाजपसाठी असलेली प्रतिकूल परिस्थिती बघता पराभवाच्या भीतीपोटी भाजपा आता छोटे छोटे मित्रपक्ष जोडत आहे. एकीकडे ४०-४० आमदार असलेल्या फुटीर गटांना जागावाटपाच्या वाटाघाटी करताना हवं ते मिळत नाही तर दुसरीकडे १-१ आमदार असलेल्या छोट्या पक्षांना मात्र भाजप पायघड्या अंथरतोय.
असला…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 21, 2024
“असला शाही पाहुणचार बघून छोटे पक्ष मनातल्या मनात मांडे खात असले तरी ‘उपयुक्तता असेपर्यंत वापरायचे आणि नंतर पूर्णतः संपवून आपले गुलाम बनवून फेकायचे’ या भाजपच्या मूळ स्वभावापासून मात्र ते अनभिज्ञ दिसतात”, असही टोला यावेळी रोहित पवारांनी भाजपला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Loksabhe Election: ‘खासदार तर मीच होणार..’; वसंत मोरेंचा आत्मविश्वास
-मावळमध्ये महायुतीचा तिढा कायम; ‘बारणेंना उमेदवारी दिली तर आम्ही प्रचार करणार नाही’
-महायुतीत वादाची ठिणगी “शिवतारेंना आवरा, त्यांच्यामुळे महायुतीतील वातावरण खराब होतंय”
-“शिवतारेंमुळे महायुतीला तडा जातोय, त्यांनी अजितदादांची जाहीर मागावी, अन्यथा आम्ही….”
-‘श्रीनिवास पवारांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जातोय’; युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया