बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार सामना रंगणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकमेकांवर टीका-टीपण्णी करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप सोबत गेल्याने पवार कुटुंबाने त्यांना विरोध करत बारामतीमध्ये अजित पवारांविरोधाची भूमिका घेतली आहे.
अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी रविवारी काटेवाडी येथे गावकऱ्यांशी संवाद साधताना अजित पवारांवर जहरी टीका केली आहे. यावेळी बोलताना अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडण्यावरुन भाष्य केले होते. श्रीनिवास पवार यांच्या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या. अजित पवार गटाकडून टीका श्रीनिवास पवार यांच्यावर टीका करण्यात आली. यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
भारतीय जनता पक्षाने राज्यासह देशाचे राजकारण अतिशय गलिच्छ व सुडाचे केले आहे..!
– महासंसदरत्न खासदार माननीय सुप्रियाताई सुळे pic.twitter.com/3odhlZV7nK
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) March 19, 2024
“श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवार हे कायमच माझा प्रचार करत आले आहेत. त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली असे मला वाटत नाही. काटेवाडी हे श्रीनिवास पवार यांचे गाव आहे. त्यांच्या मित्रपरिवारासमोर त्यांनी मन मोकळ केले इतकेच आहे. एखाद्या माणसाने आपल्या घरात, आपल्या माणसांसमोर मन मोकळे करायचे नाही का? इतकाही अधिकार या देशात राहिलेला नाही का?”, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. बारामतीमध्ये बोलताना सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
बारामतीमध्ये शरद पवार यांना हरवणे हे एकच लक्ष्य असल्याचे वक्तव्य उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर बोलताना “विकासाचे मुद्दे, दुष्काळाची परिस्थिती, महागाई, बेरोजगारी, टँकर, पिकांना हमीभाव असा मुद्दे न घेता केवळ शरद पवार यांना हरवण्याचे ध्येय ठेवणे हे दुर्देवी आहे”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-निवडणुकीत ब्लॅक मनीचा वापर होऊ नये म्हणून इनकम टॅक्सकडून विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना
-उमेदवारी डावलली अन् वरिष्ठांनी समजूत काढली, तरीही मुळीकांची नाराजी कायम; मतदारसंघातील बैठकीला दांडी
-“पुण्यातल्या भिंतीवरची ‘कमळ‘ पुसा, नाहीतर आयोगाला ‘हाताचा पंजा‘ भेट देऊ”
-“जेव्हा मी पुणे लोकसभेच्या रिंगणात उतरेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने रंगत येईल”- वसंत मोरे