पुणे : मुरलीधर मोहोळ यांना पुणे लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर अद्याप काँग्रेसकडून कोण उमेदवार असणार? हे पुढे आलेलं नाही. मोहोळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपकडून प्रचाराला देखील सुरुवात करण्यात आली असून आज विधानसभा मतदारसंघनिहाय महायुतीची समन्वय बैठक पार पडत आहे. शिवाजीनगर विधानसभेच्या बैठकीनंतर बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिश्किल टिप्पणी करत थेट काँग्रेस उमेदवाराचे नाव जाहीर केलं आहे.
मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे हे महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मोरे यांना उमेदवारी मिळाल्यास भाजपवर काय परिणाम होईल? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, “पुण्यामध्ये भाजपचे ६ लाख ३१ हजार फिक्स मतदान आहे, त्यामुळे ते कुठेही जाणार नाही. वसंत मोरे अपक्ष जरी लढले तरी त्यांचा फटका आम्हाला बसणार नाही. ते भाजपची मते खाणार नाहीत, तर समोरच्यांची म्हणजेच मोहन जोशींची मते खातील” असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.
भाजपच्या विजयाचे गणित मंडतानाच चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसकडून मोहन जोशी हे उमेदवार असतील, हे एकप्रकारे सांगून टाकलं. त्यामुळे भाजपचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेसचे मोहन जोशी, असा सामना होणार असल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘दादांच्या भूमिकेमुळेच त्यांचं कुटुंब एकटं’; रोहित पवारांचं रोखठोक भाष्य
-“शरद पवारांचा हिशोब चुकता करणारच, बस इतनाही काफी है”; चंद्रकांत पाटलांचं आव्हान
-काकांना सोडणाऱ्या दादांना भावाने सोडलं; पहिल्याच बैठकीत भरपूर सुनावलं, नेमकं काय घडलं?
-बारणेंच्या उमेदवारीला भाजपचा विरोध; भेगडेंना तिकीटाची देण्याची मागणी, बारणेंची डोकेदुखी वाढली