पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच सर्वांचं लक्ष असलेलं पवार कुटुंब या निवडणुकीत आमने सामने आले आहे. पवार कुटुंबाचा वाद चव्हाट्यावर आला असून या वादात आणखी एक ठिणगी पडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांनी शरद पवार आणि कुटुंबाविरोधात भूमिका घेतल्याने त्यांच्यायवर टीका केली. यावर आता आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया दिली आहे.
“अजित पवारांना एकटे पाडण्यात आले नसून, त्यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे त्यांचे कुटुंब एकटे पडले आहेत. श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे सख्खे भाऊ आहेत. त्यांनी जी भूमिका घेतली ती साहेबांच्या सोबत राहण्याची भूमिका आहे. स्वाभिमानी नागरिकाला विचारल्यास तोही तेच बोलेल. दादांनी घेतलेली भूमिका महागात पडेल,” असे रोहित पवार म्हणाले आहेत.
“श्रीनिवास काकांचा व्हीडिओ मी पाहिला आहे. लोकांना वाटते तीच भूमिका त्यांनी घेतली आहे. दादांना त्यांनी जवळून बघितलं आहे आणि साहेबांनाही बघितलंय. श्रीनिवास पवार यांची भूमिका पवार कुटुंबीय म्हणून सामान्य माणसांना पटणारी भूमिका आहे. पवार साहेब हे पवार कुटुंबीयांची ओळख आहे. श्रीनिवास पवार यांनी पवार कुटुंबीयांची संस्कृती बोलून दाखवली आहे. अजित पवार यांनी भूमिका घेतल्यावर कुटुंब म्हणून आम्हाला वाईट वाटलं होतं. कुटुंब म्हणून आम्ही एक आहोत. पण दादांसह त्यांच्या जवळच्या पवारांनी म्हणजेच काकींनी आणि त्यांच्या दोन मुलांनी वेगळी भूमिका घेतली आहे. मात्र, पवार कुटुंबात १०० पेक्षा जास्त पवार आहेत”, असे रोहित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“शरद पवारांचा हिशोब चुकता करणारच, बस इतनाही काफी है”; चंद्रकांत पाटलांचं आव्हान
-काकांना सोडणाऱ्या दादांना भावाने सोडलं; पहिल्याच बैठकीत भरपूर सुनावलं, नेमकं काय घडलं?
-बारणेंच्या उमेदवारीला भाजपचा विरोध; भेगडेंना तिकीटाची देण्याची मागणी, बारणेंची डोकेदुखी वाढली
-‘त्यांनी डोक शांत ठेऊन निर्णय घ्यावा’; वसंत मोरेंनी घेतली धंगेकरांची भेट