पुणे : महाराष्ट्रामध्ये २०१९ साली शिवसेना आणि भाजप महायुती सत्तेत होती. मात्र सेना-भाजपच्या ५०-५० च्या फॉर्मुल्यावरुन सेना-भाजपमध्ये मोठा वाद झाला आणि तो वाद चव्हाट्यावर आला. याचाच फायदा घेत राष्ट्रवादी काँग्रेसने घेत शरद पवारांनी शिवसेनेला सोबत घेतलं आणि महाविकास आघाडी तयार झाली. महाराष्ट्रात तेव्हा भाजपला सत्तेतून पायउतार करावा लागला आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. या पार्श्वभूमीवर आणि सध्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींवर भाजपचे नेते, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.
“राज्यात २०१९ साली शरद पवारांनी शिवसेनेला युतीतून फोडलं. हे कृत्य करुन पवारांनी राज्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही फसवणूक केली. आज बारामतीतून आम्हाला शरद पवारांचा हिशोब चुकता करण्याची संधी मिळाली आहे. मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना शरद पवारांचा पराभव करायचा, आम्ही ही संधी सोडणार नाही. बस इतनाही काफी है..”, असे आव्हान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांनी बारामतीतील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शरद पवारांवर आगपाखड केल्याचं पहायला मिळालं.
‘आता लोकसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे. सत्तेचा विजय सुकर करण्यासाठी १६ घटकपक्ष एकत्र येत महायुती तयार झाली आहे. या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपासात समन्वय राखत बूथ लेव्हलपर्यंत काम करावे’ अशा सूचना पाटलांनी बैठकीत दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-काकांना सोडणाऱ्या दादांना भावाने सोडलं; पहिल्याच बैठकीत भरपूर सुनावलं, नेमकं काय घडलं?
-बारणेंच्या उमेदवारीला भाजपचा विरोध; भेगडेंना तिकीटाची देण्याची मागणी, बारणेंची डोकेदुखी वाढली
-‘त्यांनी डोक शांत ठेऊन निर्णय घ्यावा’; वसंत मोरेंनी घेतली धंगेकरांची भेट
-मोठी बातमी: पुणे लोकसभेसाठी तिसऱ्या टप्यात १३ मे ला मतदान तर चार जूनला मतमोजणी
-मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं; महाराष्ट्रात ‘या’ तारखेला होणार मतदान