पुणे : मनसेला वसंत मोरे यांनी जय महाराष्ट्र केला आणि महाविकासा आघाडीच्या नेत्यांसोची उघडपणे भेट घेत आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुंबईत जाऊन शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. त्यामुळे वसंत मोरे हे नहाविकास आघाडीत पण नेमकं कोणत्या पक्षात जाणार आणि त्यांना पुणे लोकसभा निवडणुकीसाठी कोणता पक्ष मोरेंना लढविण्याची संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
या चर्चा सुरु असताना वसंत मोरे यांनी आता काँग्रेसचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविंद्र धंगेकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. रविंद्र धंगेकर आणि वसंत मोरे हे दोन्ही नेते पुणे लोकसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे या दोघांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली असेल. हे जाणून घेण्याची उत्सुकता आता सर्वांनाच लागली आहे.
“मागील अनेक वर्षांपासून मी आणि वसंत मोरे राजकीय जीवनात एकत्रित काम करीत आलो आहे. पुणे महापालिकेमध्ये आम्ही दोघांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली नगरसेवक म्हणून काम केले आहे. पुणे महापालिकेच्या सभागृहात एकत्रित अनेक वर्ष काम केले. त्या काळात मी विरोधी पक्षनेता होतो. तर त्यांनी गटनेता म्हणून काम केले आहे. त्यामुळे आमच्या दोघांचा स्वभाव एकमेकांना चांगला माहिती आहे. वसंत मोरे यांना सर्व पक्षाकडून निमंत्रण आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मी राजकीय जीवनातील मोठ्या भावाच्या नात्याने वसंत मोरे यांच्यापेक्षा दोन-चार वर्षांनी मोठा असेल ही बाब लक्षात घेऊन वसंत मोरे यांनी डोक शांत ठेवून निर्णय घ्यावा, तसेच आपण ज्या जुन्या पक्षात होता. त्या पक्षावर कधीच टीका करू नका असा मैत्रीचा सल्ला दिला”, असं रविंद्र धंगेकरांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मोठी बातमी: पुणे लोकसभेसाठी तिसऱ्या टप्यात १३ मे ला मतदान तर चार जूनला मतमोजणी
-मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं; महाराष्ट्रात ‘या’ तारखेला होणार मतदान
-मोहोळ-मुळीकांची गळाभेट! मुरलीधर मोहोळांनी घरी जाऊन घेतली भेट; मुळीकांचा रुसवा हटणार?
-सावधान! वेळीच मुलांना आवरा नाहीतर पालकांची होणार जेलवारी; पुणे पोलीस इन ‘ॲक्शन मोड’
-मावळच्या जागेवरुन महायुतीत रस्सीखेच? बारणेंच्या नावाची चर्चा मात्र भाजप, राष्ट्रवादी आग्रही