पुणे : राज्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. डॉ राजेंद्र भोसले यांची पुणे महापालिकेच्या आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्यमान आयुक्त विक्रम कुमार यांची एमएमआरडीएच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुका उद्या जाहीर होण्याची शक्यता असताना राज्य सरकारकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, राज्य पोलीस दलातील २१ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश सोमवारी गृहविभागाकडून जारी करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील ३ सहाय्यक निरीक्षत ९ पोलीस निरीक्षक आणि ९ उपनिरीक्षकांच्या बदल्या अंतर्गत करण्यात आल्या आहेत. त्यातच आणखी ४ बड्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची एमएमआरडीच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर पुणे महापालिकेचे नवीन आयुक्त म्हणून डॉ. राजेंद्र भोसले यांची देखील बदली करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘तानाजी सावंत भावी मुख्यमंत्री’; पुण्यातील पोस्टरची सर्वत्र चर्चा
-‘अजित पवारांनी मोक्कापासून वाचवणं ही बाब धक्कादायक’; सुप्रिया सुळेंनी दादांना धरलं धारेवर
-राज्य पोलीस दलातील २१ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या
-उद्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; केंद्रीय निवडणूक आयोगाची उद्या महत्वाची पत्रकार परिषद
-‘पुण्यात वॉशिंग मशीन नकोच’; शरद पवारांनंतर वसंत मोरे राऊतांच्या भेटीला