पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाची उद्या महत्वाची पत्रकार परिषद होणार असून उद्या लोकसभा निवडणुकीचं बिगुलही वाजणरा आहे. एकीकडे लोकसभेसाठी सर्व पक्षांची जय्यत तयारी सुरु आहे. काहींचा आपापल्या मतदारसंघात प्रचार सुरु आहे तर काही उमेदवारी जाहीर होण्याआधीच सभा बैठका मेळावे घेत आपला प्रचार करत आहेत. अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी, शिवसेनेचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुण्यात चक्क ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनेर लावले गेले आहेत.
तानाजी सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या बॅनरवर त्यांचा ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. तानाजी सावंत यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांकडून पुण्यातील कात्रज चौकात सावंत यांचा हा बॅनर लावण्यात आला आहे. तानाजी सावंत यांच्या या बॅनरची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरु आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. तसेच हे बॅनर सावंत यांच्या संमतीने लावले आहेत, की कार्यकर्त्यांनी अतिउत्साहीपणात हे बॅनर लावले आहेत, याचीही चर्चा होत आहे
महत्वाच्या बातम्या-
-‘अजित पवारांनी मोक्कापासून वाचवणं ही बाब धक्कादायक’; सुप्रिया सुळेंनी दादांना धरलं धारेवर
-राज्य पोलीस दलातील २१ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या
-उद्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; केंद्रीय निवडणूक आयोगाची उद्या महत्वाची पत्रकार परिषद
-‘पुण्यात वॉशिंग मशीन नकोच’; शरद पवारांनंतर वसंत मोरे राऊतांच्या भेटीला
-‘निलेशला मीच पक्षात आणलं, मनापासून आधार दिला’; लंकेंच्या पक्षप्रवेशावर अजित पवारांची प्रतिक्रिया