नवी दिल्ली : सर्वांचं लक्ष लागून असलेल्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल उद्या वाजणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग उद्या (शनिवारी) दुपारी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणार आहेत.
निवडणूक आयोगाने यापूर्वी सर्व राज्यांचा दौरा करुन तेथील निवडणूक तयारीचा आढावा घेतला आहे. ही लोकसभा निवडणूक ५ ते ७ टप्प्यात होणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर ३० मे रोजी पर्यंत नवी लोकसभा अस्तित्वात आणण्याच्या दृष्टीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडून वेळापत्रक आखले जाण्याची अपेक्षा आहे.
केंद्र सरकारकडे निम लष्करी दलाचे ३ लाख ५० हजार मनुष्यबळाची मागणी केली आहे. केंद्र सरकारने या मागणीस आधीच मंजुरी दिली आहे. निवडणुका नि:पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने संपूर्ण देशभर २ हजार ५०० निवडणूक निरीक्षक नेमले आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दोनच दिवसांपूर्वी राजधानीत बैठक घेऊन त्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या. केंद्र सरकारने नेमलेले दोन निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू हे यांनी आज निवडणूक आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. हे दोन्ही निवडणूक आयुक्त उद्याच्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहणे अपेक्षित आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘पुण्यात वॉशिंग मशीन नकोच’; शरद पवारांनंतर वसंत मोरे राऊतांच्या भेटीला
-‘निलेशला मीच पक्षात आणलं, मनापासून आधार दिला’; लंकेंच्या पक्षप्रवेशावर अजित पवारांची प्रतिक्रिया
-“माझ्या मतदारसंघात दमदाटी कराल तर गाठ माझ्याशी”; सुप्रिया सुळेंचा अजितदादा गटाला इशारा
-“उद्या म्हणाल अजितदादांच्या शिपायाला मत द्या, नीच प्रवृत्ती असलेले समाजात..” शिवतारे पुन्हा आक्रमक
-‘मी मावळमध्ये शिवसेनेकडूनच लढणार’; श्रीरंग बारणेंची स्पष्टोक्ती