बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या गटात गुरुवारी प्रवेश केला. ‘आम्ही सुरवातीपासून पवार साहेबांच्या विचाराचे आहोत’ असं म्हणत निलेश लंके यांनी अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांसोबत गेले. यावर आता अजित पवारांनी निलेश लंकेंच्या प्रवेशाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“वास्तविक निलेशला पक्षात मी घेतल. निलेशला मनापासून आधार दिला. विकास कामांसाठी मी त्याला प्रचंड निधी दिला होता”, असं अजित पवार बारामतीमध्ये म्हणाले आहे.
“निलेश लंके जाऊ शकत नाही. त्याला जायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल. त्याच्यामुळे राजीनामा देऊन कोणालाही कोठेही जाता येतं. वास्तविक निलेशला पक्षात मी घेतल. निलेशला मनापासून आधार दिला. विकास कामांसाठी मी त्याला प्रचंड निधी दिला होता. कालच माझ्याकडे तो आला होता. काही गोष्टी त्याला मी नीट समजून सांगितल्या. मात्र, काही लोकांनी त्याच्या डोक्यात हवा घातलेली आहे की, तू खासदार होशील. मात्र, अस काहीही नाही”, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“माझ्या मतदारसंघात दमदाटी कराल तर गाठ माझ्याशी”; सुप्रिया सुळेंचा अजितदादा गटाला इशारा
-“उद्या म्हणाल अजितदादांच्या शिपायाला मत द्या, नीच प्रवृत्ती असलेले समाजात..” शिवतारे पुन्हा आक्रमक
-‘मी मावळमध्ये शिवसेनेकडूनच लढणार’; श्रीरंग बारणेंची स्पष्टोक्ती
-‘भाजपला आणखी ४ जागा मिळणार, बारामतीची जागा अजितदादांनाच’- चंद्रकांत पाटील
-वसंत मोरे शरद पवारांच्या कार्यालयात पोहचले पण पक्षप्रवेशाविनाच परतले