पुणे : भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या इंदापूरात फिरु नको अशी धमकी मिळाल्याची तक्रार म्हणून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. भाजपचे मित्रपक्षच आपल्या शिवीगाळ करीत असल्याचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले होते. हे अत्यंत धक्कादायक असून यात तात्काळ लक्ष घालावे असे पत्रच हर्षवर्धन पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहीले होते. त्याच मुद्यावरून सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या नेत्यांचा समाचार घेतला तसेच अजित पवार गटावरही निशाणा साधला आहे.
बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार गट आणि खासदार शरद पवार गट हे दोन्ही गट जोमाने प्रचार करताना दिसत आहेत. त्यातच बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथे मेळाव्यामध्ये बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी अजित पवार गटाला थेट इशाला दिला आहे.
“माझ्या मतदारसंघात दमदाटी कराल तर गाठ माझ्याशी आहे. माझा नंबर लिहू घ्या. तुम्हाला कोणाचाही फोन आला तर माझा नंबर द्या आणि सांगा की आधी सुप्रिया ताईशी बोला. मी बोलते मग, बघून घेईन, असं सुप्रिया सुळेंनी ठणकावून सांगितलं. बारामती मतदारसंघात किंवा राज्यात भाजप आणि राष्ट्रवादीमधील नेते एकमेकांना धमकी देत आहेत. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का?” असा खडा सवाल विचारत सुप्रिया सुळे अजित पवार गटाला टोला लगावला आहे.
“सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे, जसा चढता काळ येतो, तसा उतारही येतो. मला काहीच करायची गरज नाही, त्यांची सगळी मस्ती जनता लवकरच उतरवेल. आम्ही लोकशाहीने निवडणूक लढवत आहोत त्यामुळे आम्ही दडपशाहीला घाबरणार नाही”, असंही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“उद्या म्हणाल अजितदादांच्या शिपायाला मत द्या, नीच प्रवृत्ती असलेले समाजात..” शिवतारे पुन्हा आक्रमक
-‘मी मावळमध्ये शिवसेनेकडूनच लढणार’; श्रीरंग बारणेंची स्पष्टोक्ती
-‘भाजपला आणखी ४ जागा मिळणार, बारामतीची जागा अजितदादांनाच’- चंद्रकांत पाटील
-वसंत मोरे शरद पवारांच्या कार्यालयात पोहचले पण पक्षप्रवेशाविनाच परतले
-शरद पवारांच्या मंचावर आले पण प्रवेश टाळला; निलेश लंकेंना नेमकी भीती कशाची?