पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी काल (गुरुवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात शड्डू ठोकला आहे. शिवतारे बारामती मतदारसंघातून पवारांविरेधात निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. महायुतीमध्ये एकत्र असलेल्या दोन्ही नेत्यांमध्ये हे राजकीय वैर पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवतारेंनी भेट घेतली. याबाबत पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी शिंदेंसोबत काय चर्चा केली हे सांगितलं आहे.
महायुतीने लोकसभेसाठी जे काही टार्गेट ठेवले आहेत या बाबत गाऊंड रिअॅलिटी काय आहे, हे आपण मुख्यमंत्री शिंदेंना सांगितले. महायुतीमध्ये जिंकणे हे मेरिट असेल तर सर्व बाजूने विचार करुन रिपोर्ट घ्यावे. कारण बारामतीमध्ये आतापर्यंत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असे चित्र होते. परंतु गेल्या चार-पाच दिवसांमध्ये त्यात मोठा बदल झाला आहे. माझ्या उमेदवारीबाबत माहिती जाहीर होताच परिस्थिती बदलली आहे. यासंदर्भात गोपनीय रिपोर्ट घ्यावे, असे आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले आहे”, असं शिवतारे म्हणाले आहेत.
“अजित पवारांच्या सौभाग्यवती आहेत म्हणून आम्ही त्यांना मतदान करायचं? सुनेत्रा पवारांचं काय योगदान आहे का? हे नाही चालणार. समाजात योगदान नसलेल्यांना मतदार का करायचं? उद्या तुम्ही म्हणाल अजित पवारांच्या शिपायाला मतदान करा. नीच प्रवृत्ती असलेले समाजात चालत नाही. महायुतीच्या नेत्यांनी विचार करायला हवा. ‘घराणेशाही संपवली पाहिजे’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कन्सेप्ट आहे”, असं विजय शिवतारे म्हणाले आहेत.
आपण उमेदवार जाहीर केल्यानंतर अजित दादांचा फोन नाही. मी एकवेळा मतभेद दूर करण्याचा माझा प्रयत्न केला होता. विमानतळावर त्यांना बुके दिले होते. परंतु ते बोललेसुद्धा नाही. यामुळे आता मनोलमिलन शक्य नाही. आयुष्यात कधीच मनोमिलन होणार नाही, असे विजय शिवतारे यांनी स्पष्ट सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘मी मावळमध्ये शिवसेनेकडूनच लढणार’; श्रीरंग बारणेंची स्पष्टोक्ती
-‘भाजपला आणखी ४ जागा मिळणार, बारामतीची जागा अजितदादांनाच’- चंद्रकांत पाटील
-वसंत मोरे शरद पवारांच्या कार्यालयात पोहचले पण पक्षप्रवेशाविनाच परतले
-शरद पवारांच्या मंचावर आले पण प्रवेश टाळला; निलेश लंकेंना नेमकी भीती कशाची?
-विजय शिवतारेंनी केला प्रचाराचा श्रीगणेशा; कन्हेरीच्या मारुतीच्या चरणी नतमस्तक