पुणे : पुण्यातील मनसेचे फायरब्रॅंड नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी आता पक्षाला राजीनामा दिला आहे. वसंत मोरे यांनी पक्षाला राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासूनच वसंत मोरे हे पक्षात नाराज असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. गेल्या वर्षभरापासून वसंत मोरेंची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू होते. शिवतीर्थवर बोलावून समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तरीही मोरेंची नाराजी कायम राहिली.
गेल्या काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरद पवार आणि बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली होती तेव्हाही मोरे पक्ष बदलण्याच्या तयारीत असल्याची चर्चेने जोर धरला होते.
“मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होतो. पण माझ्या बद्दलच्या नकारात्मक गोष्टी राज ठाकरेंपर्यंत पोहोचवल्या गेल्या. वारंवार माझ्यावर काहींनी आरोप केले. वसंत मोरे नाराज आहे. वसंत मोरे स्वकेंद्रीत राजकारण करतो असं माझ्याबद्दल बोललं गेलं” असं मोरें पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यावर म्हणाले आहेत.
“एवढी वर्ष मनसेत कधी स्वकेंद्रीत राजकारण केलं नाही. तिथे राहून उगाच माझ्या चारित्र्यावर आरोप होत असतील, तर अशा ठिकाणी न राहिलेलं बरं” असं वसंत मोरे म्हणाले आहेत.
“माझी आता कुठलीही भूमिका नाही. मी सर्व पदाचे राजीनामे दिले आहेत. पक्ष सदस्यत्व सोडलं आहे. मी संघटनेत नाही. माझी पुढची भूमिका आता पुणेकर ठरवतील. पुढच्या दोन-तीन दिवसात भूमिका जाहीर करेन” असंही वसंत मोरे म्हणाले आहेत.
दरम्यान, शरद पवारांच्या भेट, मनसेला रामराम आता वसंत मोरे कोणासोबत जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ईडीच्या १८ वर्षांतील कारवायांचा शरद पवारांनी वाचला पाढा; रोहित पवारांवर केलेल्या कारवाईवरून आक्रमक
-महायुतीच्या जागावाटपाबाबत अजित पवारांचं वक्तव्य; ‘जागावाटपाची प्राथमिक चर्चा झालीय तिन्ही पक्ष…’
-दिल्ली दरबारी महायुतीची महत्वाची बैठक; लोकसभेसाठी महायुतीकडून पुण्यात ‘या’ नावाला पसंती
-पुणे मेट्रो धावणार चांदणी चौक ते वाघोलीपर्यंत, विस्तारीत मार्गाला मान्यता
-भुयारी मार्गच्या उद्घाटनाचा स्थानकांनीच घेतला पुढाकार; निगडीत नागरिकांनीच केलं लोकापर्ण