पुणे : येत्या काही दिवसांनी लोकसभा निवडणूक जाहीर होईल. याच लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचं तेढ अद्यापही सुटले नाही. महायुतीच्या जागावाटपाबाबत सर्व मित्रपक्षांच्या दिल्ली-मुंबईत बैठका होत आहेत. मंगळवारी महायुतीची दिल्लीत बैठक होणार असं सांगितलं जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र त्याबाबत निश्चित काही ठरलेलं नसल्याचं सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागावाटपाबाबत अजित पवार यांनी सूचक विधान केलं आहे.
“काल दिल्लीत जागावाटपबाबत बैठक होणार होती. पण कालची बैठक पुढे ढकलली आहे. ती आज किंवा उद्या होऊ शकते. जागावाटपाची प्राथमिक चर्चा झाली आहे. तिन्ही पक्षांनी एकत्र बसून बोलणी केली. प्रत्येकाचा मान-सन्मान राखला जाईल, कार्यकर्त्यांना समाधान वाटेल असा तोडगा काढण्याचा प्रयत्न आमचा असेल. बहुतेक विद्यमान जागा त्या त्या पक्षाला सोडण्याची प्राथमिक चर्चा झालेली आहे. त्यासंदर्भात अंतिम चित्र आम्हालाही लवकरात लवकर स्पष्ट करावं लागणार आहे. १४-१५ तारखेला आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे”, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या १११व्या जयंतीनिमित्त बोलताना अजित पवार यांनी राजकारणातील सुसंस्कृतपणावर भाष्य केलं आहे. “खऱ्या अर्थानं यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणात सुसंस्कृतपणा कसा टिकवायचा असतो, सांभाळायचा असतो, काम करायचं असतं हे उभ्या महाराष्ट्राला दाखवलं. तोच आदर्श नव्या पिढीनं, आम्ही सगळ्यांनी ठेवला पाहिजे. अलिकडे वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. काहीही बोलत असतात, कुणी खेकडा म्हणतं, कुणी वाघ म्हणतं. अशा गोष्टी थांबायला हव्यात”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-दिल्ली दरबारी महायुतीची महत्वाची बैठक; लोकसभेसाठी महायुतीकडून पुण्यात ‘या’ नावाला पसंती
-पुणे मेट्रो धावणार चांदणी चौक ते वाघोलीपर्यंत, विस्तारीत मार्गाला मान्यता
-भुयारी मार्गच्या उद्घाटनाचा स्थानकांनीच घेतला पुढाकार; निगडीत नागरिकांनीच केलं लोकापर्ण
-अजितदादांना धक्का अन् काकांना साथ, निलेश लंकेंच पक्क ठरलंय? पुण्यात नेमकं काय घडलं?
-लोकसभा निवडणुकीपूर्वीच बारामतीत महायुतीत राडा; पवारांना पाडण्याचा नारा देत दिग्गज नेता मैदानात