पुणे : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होतील. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता दिल्ली दरबारातून महत्वाची बातमी समोर येत आहे. महायुतीच्या जागावाटप होण्या आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महत्वाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी काही मतदारसंघात उमेदवार बदलण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांनतर महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची देखील आज दिल्ली दरबारी महत्वाची बैठक झाली.
पुणे लोकसभा मतदारसंघातून या निवडणुकीसाठी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. आज झालेल्या बैठकीमध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. पुण्यात मुरलीधर मोहोळ यांचा दांडगा जनसंपर्क लक्षात घेता मोहोळ यांनाउमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
पुणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात मुरलीधर मोहोळ, आमदार जगदीश मुळीक, सुनील देवधर, शिवाजीराव मानकर हे इच्छुक उमेदवार आहेत. आजच्या बैठकीत नेमकं कोणाच्या शिक्कामोर्तब होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे मेट्रो धावणार चांदणी चौक ते वाघोलीपर्यंत, विस्तारीत मार्गाला मान्यता
-भुयारी मार्गच्या उद्घाटनाचा स्थानकांनीच घेतला पुढाकार; निगडीत नागरिकांनीच केलं लोकापर्ण
-अजितदादांना धक्का अन् काकांना साथ, निलेश लंकेंच पक्क ठरलंय? पुण्यात नेमकं काय घडलं?
-लोकसभा निवडणुकीपूर्वीच बारामतीत महायुतीत राडा; पवारांना पाडण्याचा नारा देत दिग्गज नेता मैदानात
-“निवडणुकीला उभं न राहण्याची ईडीकडून अप्रत्यक्ष धमकी”; शरद पवारांचा गंभीर आरोप