पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके हे उपमुख्यमंत्री अजित पवार गटातून खासदार शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लंके यांच्या पक्षप्रवेशाबाबत काहीच माहिती नसल्याचंं म्हटलं आहे. शिरुरचे शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांची आज पुण्यात भेट घेतली. अमोल कोल्हे यांनी दोघांच्या बैठकीनंतर निलेश लंके हे लवकरच शरद पवार गटात येतील असा सुतोवाच केला होता. त्याहूनही राजकारणात अनेक विधचर्चांना उधाण आलं होतं. या सर्व चर्चांना आता निलेश लंके यांनी पुर्णविराम दिला आहे.
“राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या चर्चेत तथ्य नाही. कार्यकर्त्यांचा आग्रह झाल्यास व पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास जबाबदारी स्वीकारावी लागेल”, असं म्हणत निलेश लंके यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा पुन्हा एकदा बोलून दाखवलं आहे.
अजितदादा गटाचे आमदार निलेश लंके नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. त्यादृष्टीने त्यांचे मतदारसंघात कार्यक्रम व भेटीगाठी सुरू आहेत. या कार्यक्रमातून ते लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेतही मिळत आहेत. त्यांचे समर्थकही त्या दृष्टीने चर्चा करत आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याच्या प्रयोगाच्या निमित्ताने नगरमध्ये बोलताना आमदार लंके यांना ‘तुतारी’ वाजवण्याचे निमंत्रण दिले होते. त्यावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या. त्यावर आता लंके यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे मेट्रो धावणार चांदणी चौक ते वाघोलीपर्यंत, विस्तारीत मार्गाला मान्यता
-भुयारी मार्गच्या उद्घाटनाचा स्थानकांनीच घेतला पुढाकार; निगडीत नागरिकांनीच केलं लोकापर्ण
-अजितदादांना धक्का अन् काकांना साथ, निलेश लंकेंच पक्क ठरलंय? पुण्यात नेमकं काय घडलं?
-लोकसभा निवडणुकीपूर्वीच बारामतीत महायुतीत राडा; पवारांना पाडण्याचा नारा देत दिग्गज नेता मैदानात
-“निवडणुकीला उभं न राहण्याची ईडीकडून अप्रत्यक्ष धमकी”; शरद पवारांचा गंभीर आरोप