पुणे : पुणे शहरातील निगडी येथील नागरिकांना ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना रस्ता सुखरूप ओलांडता यावा याकरिता महापालिकेकडून भुयारी मार्ग उभारण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून भुयारी मार्ग करण्यात यावा यासाठी नागरिकांसह विद्यार्थी व व्यापारी मागणी करत होते. याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर महापालिकेकडून या भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्यात आहे. निगडी प्रभाग क्र. 13 गावठाण येथील भुयारी मार्गाचे उद्घाटन अखेर स्थानिक नागरिकांनीच केले आहे.
निगडी येथे भुयारी मार्ग होण्यापूर्वी रस्ता ओलांडत असताना अनेक ज्येष्ठ नागरिक व महिलांना तारेवरची कसरत करावी लागते. जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत होता. अनेकदा अपघाताला सामोरे जावे लागले होते. काही अपघातामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना हा रस्ता ओलांडणे धोकादायक होते.
सध्या पुणे शहरातच वाहतूक कोंडीचे प्रमाण अधिकच वाढले आहे. त्यात शहरात सुरू असणारं मेट्रोचं काम, वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन या सर्व गोष्टींमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मार्गावरून वाहने वेगात असल्याने अलीकडच्या काळात अपघातांचे प्रमाण देखील वाढले होते. यामुळे हा पूल उभारण्याबाबत नागरिकांनी पाठपुरावा केला होता.
नागरिकांच्या पाठपुराव्यानंतर महापालिकेकडून निगडी येथे भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात आले. या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेऊन या भुयारी मार्गाचे लोकार्पण केले. निगडीतील या भुयारी मार्गामुळे इथून पुढील काळात घडणाऱ्या अपघाताला आळा बसणार आहे. यामुळे येथील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
दरम्यान, या भुयारी मार्गाच्या उद्घाटना वेळी माजी नगरसेवक सचिन चिखले, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रोहिदास शिवनेकर, देवेंद्र निकम, चंद्रकांत दानवले, खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तानाजी काळभोर, मारुती भापकर, राजेंद्र काळभोर, मधुराज पवळे, रोहित काळभोर, मंगेश काळभोर, सागर सोनटक्के, नजीर खाटीक व प्रभागातील जेष्ठ नागरिक व व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-अजितदादांना धक्का अन् काकांना साथ, निलेश लंकेंच पक्क ठरलंय? पुण्यात नेमकं काय घडलं?
-लोकसभा निवडणुकीपूर्वीच बारामतीत महायुतीत राडा; पवारांना पाडण्याचा नारा देत दिग्गज नेता मैदानात
-“निवडणुकीला उभं न राहण्याची ईडीकडून अप्रत्यक्ष धमकी”; शरद पवारांचा गंभीर आरोप
-“येत्या दोन दिवसांत महायुतीचं जागावाटप ठरणार, ४८ जागांचा निर्णय झाल्यानंतर आम्ही..”
-‘आम्ही भेटलो म्हणजे आमचं मनोमिलन नाही’; कट्टर विरोधक दिलीप मोहितेंची आढळरावांवर नाराजी कायम