पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात रोज नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत फूट पडली. या फुटीचे येत्या लोकसभा निवडणुकीत मोठे परिणाम दिसून येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससाठी सर्वाधिक महत्वाची मानली जाणारी निवडणूक म्हणजे बारामती लोकसभेची. या मतदारसंघात इतिहासात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार सामना पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नीसुनेत्रा पवार आणि बारामतिच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या बारामतीमधून निवडणुकीच्या रिकगणार उतरणार आहेत. त्यातच अजित पवारांचे कट्टर विरोधक असलेले शिवसेनेचे माजी मंत्री विय शिवतारे हे बारामतीतून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत.
तिरंगी लढत होण्याची चिन्हे
बारामती लोकसभा हा काही कोणाचा सातबारा नाही. सतत बारामतीचाच खासदार का. अजित पवारांनी अपमान केला, आता बदला घेण्याची वेळ आली आहे”, असे विजय शितारे म्हणाले आहेत.
“यांनाच का म्हणून सतत मतदान करायचं? ज्या ठिकाणी अपमान केला तिथेच येऊन माफी मागा. आता लढाई दोन पवार विरुद्ध विजय बापू शिवतारे अशी असेल”, असं म्हणत विजय शिवतारेंनी पवारांविरोधात दंड थोपटले आहे. विजय शिवतारे हे पुरंदर तालुक्यात ‘खेळ खेळू पैठणीचा’ या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी ‘सगळ्यांनी मिळून आता यांना पाडा आणि कार्यक्रम करा’, असे आवाहन केले आहे.
विजय शिवतारे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर पवार कुटुंबापुढे आता नवं आव्हान उभं ठाकलं आहे. शिवतारे यांच्या या लढतीमुळे या लोकसभा निवडणुकीत वेगळी रंगत पहायला मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“निवडणुकीला उभं न राहण्याची ईडीकडून अप्रत्यक्ष धमकी”; शरद पवारांचा गंभीर आरोप
-“येत्या दोन दिवसांत महायुतीचं जागावाटप ठरणार, ४८ जागांचा निर्णय झाल्यानंतर आम्ही..”
-‘आम्ही भेटलो म्हणजे आमचं मनोमिलन नाही’; कट्टर विरोधक दिलीप मोहितेंची आढळरावांवर नाराजी कायम
-“कार्ट्यांना नीट सांभाळा…आता कोयता गँगचा सुपडाच साफ करणारे”- अजित पवार
-राहुल गांधीविरोधात दाखल दाव्यात कसूर; न्यायालयाने पोलिसांना बजावली कारणे दाखवा नोटीस