पुणे : लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभा खासदार शरद पवार असे दोन गट पडले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीने कारवाई करत कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीकडून जप्त करण्यात आला. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शर पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत अनेक विविध विषयांवर भाष्य केले आहे.
“मोदी सरकारकडून देशातील तपास यंत्रणांचा गैरवापर होत असून तपास यंत्रणांकडून देशात टोकाची दहशत निर्माण केली जात आहे. आतापर्यंत ११५ विरोधी नेत्यांची ईडीने चौकशी केली आहे. ईडी हा भाजपचा सहकारी पक्ष बनला आहे”, असे शरद पवार म्हणाले आहेत.
“निवडणुकीला तुम्ही उभे राहु नका, अशी अप्रत्यक्ष धमकी ईडी मार्फत दिली जात आहे. २००५-२०२३ दरम्यान ईडीने केलेल्या कारवाईत ८५ टक्के लोक हे विरोधी पक्षाचे आहेत. महाराष्ट्रासहअन्य राज्यातील मंत्र्यांच्या विरोधात तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे,” असे शरद पवार म्हणाले.
“निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी राजीनामा का दिलाय याची कारणमिमांसा स्पष्ट झालेली नाही याची आम्हला काळजी आहे.
ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा गैरवापर सुरुय. याचे उदाहरण कर्नाटकातील डी. के. शिवकुमार यांच्या बाबतीत पहायला मिळाले. कर्नाटकातील दोन नंबरच्या मंत्र्याला अटक करण्यात आली होती.
“महाराष्ट्रात देखील याची सुरुवात झालीय. अनिल देशमुख आणि संजय राऊत यांना विनाकारण अटक करण्यात आली. रोहित पवारांच्या बातमीत देखील त्यांच्या कारखान्याच्या जप्तीची प्रक्रिया सुरु करण्यात आलीय. अवसायानात निघालेले निम्म्याहून अधिक कारखाने पंचवीस कोटीहून कमी रकमेला विकले गेले. रोहित पवारांच्या कंपनीने कारखाना पन्नास कोटींना विकला गेला”, अस शरद पवारांनी सांगितलं आहे.
“ईडीच्या 5 हजार केसेसपैकी फक्त पंचवीस केसेसचा निकाल लागलाय. त्यातील किती प्रकरणात लोक दोषी आढळलेत याचे प्रमाण शुन्य टक्क्यांहून कमी आहे. ईडीने कारवाई केलेल्यांपैकी एकही व्यक्ती भाजपचा नाही. सगळेच विरोधी पक्षातील आहेत.
“कॉंग्रेसच्या सत्ताकाळात इ डी चा गैरवापर होत नव्हता. ईडीचा उपयोग दहशत निर्माण करण्यात येत आहे. रोहित पवारांना अटक होईल का याबाबत भरवसा नाही कारण अनिल देशमुख आणि संजय राऊत यांना देखील अटक करण्यात आली होती”, असंही शरद पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“येत्या दोन दिवसांत महायुतीचं जागावाटप ठरणार, ४८ जागांचा निर्णय झाल्यानंतर आम्ही..”
-‘आम्ही भेटलो म्हणजे आमचं मनोमिलन नाही’; कट्टर विरोधक दिलीप मोहितेंची आढळरावांवर नाराजी कायम
-“कार्ट्यांना नीट सांभाळा…आता कोयता गँगचा सुपडाच साफ करणारे”- अजित पवार
-राहुल गांधीविरोधात दाखल दाव्यात कसूर; न्यायालयाने पोलिसांना बजावली कारणे दाखवा नोटीस
-धक्कादायक! समलैंगिक असल्याचं लपवून केला विवाह; महिलेनं गाठलं पोलीस स्टेशन