पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठला आहे. शहरात दिवसाढवळ्या खून, आत्महत्या, बलात्कार, सर्वात मोठं प्रकरण ड्रग्ज, कोयता गँगचा दहशत माजवणं अशा सर्व घटनांनी पुणे हादरून गेलं आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार रविवारी पुणे दौऱ्यावर असताना गुन्हेगारांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
“आम्ही कायदा-सुव्यवस्था चांगली राखण्यासाठी प्रयत्न करतोय. मी जाहीरपणे सांगतो. आम्ही आजच पोलीस आयुक्तांना पुन्हा सांगितलं आहे. कोयता गँग कोयता गँग, कसली रे कोयता गँग? या कोयता गँगवाल्यांचा तर सुफडा साफच करुन टाकणार आहे. या गोष्टी आम्ही अजिबात खपवून घेणार नाही”, असं सांगत अजित पवारांनी गुन्हेगारांना तंबी दिली आहे.
“ते पोरगं कुणीही, कितीही मोठ्या बापाचं असलं तरी त्याच्या मुलाहीजा ठेवला जाणार नाही. म्हणून मी आज जाहीरपणे सांगतो. उद्या कुणी म्हटलं की, दादा एकदा चूक झाली. पदरात घ्या. आमचा आता पदर फाटला आहे. पदरात घेण्यासारखी परिस्थिती नाही. पदर नाही आणि धोतरही नाही. डायरेक्ट टायरमध्येच. मध्ये कुठे नाही”, असं अजित पवार म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-राहुल गांधीविरोधात दाखल दाव्यात कसूर; न्यायालयाने पोलिसांना बजावली कारणे दाखवा नोटीस
-धक्कादायक! समलैंगिक असल्याचं लपवून केला विवाह; महिलेनं गाठलं पोलीस स्टेशन
-दर्ग्याचे ट्रस्ट स्वतः दर्ग्याच्या बाजूचं अतिक्रमण हटवणार; तणाव निवळणार
-पुणेकरांना आता जलद बससेवा मिळणार; पीएमपीच्या ताफ्यात लवकरच ५०० नव्या गाड्या
-पुणे लोकसभेकडून निवडणूक लढण्याबाबत वसंत मोरेंचं स्पष्ट वक्तव्य