पुणे : पुणे शहराती शुक्रवारी मध्यरात्रीपासून एका अफवेमुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या कसबा पेठतील सलाउद्दीन दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार असल्याची अफवा पसरली होती. एका अफवेमुळे निर्माण झालेल्या तणावाची परिस्थिती पोलिसांनी कशीबशी हाताळत शांततापूर्ण वातावरण निर्माण केले. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी दर्ग्याच्या ट्रस्टींसोबत बैठक घेतली.
पोलिसांनी घेतलेल्या या बैठकीत दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम काढण्याची तयारी ट्रस्टकडून देण्यात आली. पुणे पोलिसांच्या या पुढाकारामुळे शहरातील तणाव निवळला आहे. दर्ग्याचे अतिक्रमण काढण्याबाबतचे निवेदन ट्रस्टीकडून देण्यात आले आहे.
पुण्यातील शेख सल्लाउद्दीन दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामाबाबत ट्रस्टचा महत्वपूर्ण निर्णय झाला आहे. दर्ग्याचे बांधकाम हे अनधिकृत असल्याची ट्रस्टकडून कबुली देण्यात आली. छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा ट्रस्टी, पुणे मनपा आणि पुणे पोलिसांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर ट्रस्टींकडून अतिक्रमण झालेले बांधकाम स्वता:हून काढून घेण्याची तयारी दर्शवली आहे.
दर्ग्याच्या ट्रस्ट कडून स्वतः दर्ग्याच्या बाजूचा अतिक्रमण हटवण्यात येणार आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतलेल्या बैठकीत ट्रस्टने हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. ट्रस्टीने विनंती केल्यास कायदेशीर असलेल्या कामांच्या नूतनीकरणासाठी पुणे मनपाकडून मदत करण्यात येणार आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतलेल्या बैठकीत ट्रस्टने हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. ट्रस्टीने विनंती केल्यास कायदेशीर असलेल्या कामांच्या नूतनीकरणासाठी पुणे मनपाकडून मदत करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांना आता जलद बससेवा मिळणार; पीएमपीच्या ताफ्यात लवकरच ५०० नव्या गाड्या
-पुणे लोकसभेकडून निवडणूक लढण्याबाबत वसंत मोरेंचं स्पष्ट वक्तव्य
-बेंगळुरु स्फोटाचं पुणे कनेक्शन काय??? रामेश्वरम कॅफे स्फोटातील संशयित पुण्यात असल्याचा संशय
-सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच कार्यक्रमाला; नणंद-भावजईच्या गळाभेटीची चर्चा
-‘मनात विचार आला आता भाजपमध्ये जायला पाहिजे का?’; ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवारांचं ट्विट