पुणे : पीएमपीमएलसाठी महापालिकेकडून विजेवर धावणाऱ्या ५०० नव्या गाड्यांची खरेदी करण्यात येणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची प्रमुख सार्वजनिक बससेवेत ५०० नव्या बसची भर पडणार आहे. त्यामुळे पीएमपीच्या ताफ्यात गाड्यांची संख्या वाढणार आहे. प्रवाशांना आता जलद सेवा मिळणार आहे.
पीएमपीएमएलच्या प्रशासनाने गेल्या काही महिन्यांत काही गाड्यांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबतचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या बैठकीतही मंजूर झाला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील किमान १० लाख प्रवाशांच्या तुलनेत पीएमपीएमएलच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या अपुरी आहे.
बसच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या वाढविण्याची मागणी सातत्याने स्वयंसेवी संस्था, प्रवासी संस्थांकडून होत होती. याच सर्व बाबींचा विचार करता पुढील वर्षभरात नव्याने ५०० गाड्या खरेदी करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.
पीएमपीच्या ताफ्यात सध्या विजेवर धावणाऱ्या ४७३ गाड्या आहेत. येत्या काही दिवसांत १७७ नव्या गाड्या दाखल होणार असून त्यामुळे ही संख्या ६५० एवढी होणार आहे. त्यामध्ये नव्याने घोषणा केल्याप्रमाणे ५०० गाड्यांची भर पडणार आहे. प्रस्तावित ५०० गाड्यांमध्ये १०० गाड्या विजेवर धावणाऱ्या, तर ४०० गाड्या सीएनजीवरील असतील, असे महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले.
येत्या काही दिवसांतच नव्या गाड्यांच्या खरेदीची निविदा प्रक्रिया प्रसिद्ध होणार आहे. १७७ नव्या गाड्यांची खरेदी पहिल्या टप्प्यात करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे लोकसभेकडून निवडणूक लढण्याबाबत वसंत मोरेंचं स्पष्ट वक्तव्य
-बेंगळुरु स्फोटाचं पुणे कनेक्शन काय??? रामेश्वरम कॅफे स्फोटातील संशयित पुण्यात असल्याचा संशय
-सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच कार्यक्रमाला; नणंद-भावजईच्या गळाभेटीची चर्चा
-‘मनात विचार आला आता भाजपमध्ये जायला पाहिजे का?’; ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवारांचं ट्विट
-१०० रुपये कसले कमी करता, गॅस ४०० रुपयांना द्या; सुप्रिया सुळे मोदी सरकारवर आक्रमक