पुणे : सर्वांच्या नजरा येत्या लोकसभा निवडणुकांकडे लागल्या आहेत. पुणे लोकसभा निवडणुकीकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष आहे. या निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ सुरु आहे. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील वारंवार पुणे दौऱ्यावर असतात. पुण्यात पदाधिकारी आणि नेत्यांच्या बैठका घेत आहेत.
मनसेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पुण्यातील मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी ही निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. आज वसंत मोरे यांनी नाशिकमध्ये पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.
“नाशिकमध्ये मनसेने सत्तेचं तोरण बांधलं होतं. आता लोकसभेच्या निवडणुका आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या मेळाव्याला मोठं महत्व प्राप्त झालं आहे. पुणे लोकसभेकडून निवडणूक लढण्यासाठी मी इच्छुक आहे. राज ठाकरेंनी मला ती संधी दिली तर शंभर टक्के मनसेचा पहिला खासदार होण्याची भूमिका बजावेन”, असा दावा वसंत मोरे यांनी केला आहे. “लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे जो निर्णय घेतील तोच निर्णय अंतिम राहिल”, असंही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-बेंगळुरु स्फोटाचं पुणे कनेक्शन काय??? रामेश्वरम कॅफे स्फोटातील संशयित पुण्यात असल्याचा संशय
-सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच कार्यक्रमाला; नणंद-भावजईच्या गळाभेटीची चर्चा
-‘मनात विचार आला आता भाजपमध्ये जायला पाहिजे का?’; ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवारांचं ट्विट
-१०० रुपये कसले कमी करता, गॅस ४०० रुपयांना द्या; सुप्रिया सुळे मोदी सरकारवर आक्रमक
-‘सत्तेच्या अहंकारामुळे शेळकेंच्या डोक्यात हवा गेली’; राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात तुफान जुंपली