पुणे : पुणे शहरात रात्रीपासून भीतीचं वातावरण पसरलं आहे. बेंगळुरु येथिल रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटातील संशयित दहशतवादी हा पुण्यात असल्याचा संशय हा एनआयएला (राष्ट्रीय तपास यंत्रणा) आहे. स्फोटानंतर संशयित दहशतवादी हा बेंगळुरूमधील बल्लारी आणि तेथून भटकळ, गोकर्ण, बेळगाव, कोल्हापूरमार्गे तो पुण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे तपास यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.
बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेत १ मार्च रोजी दुपारी बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता. या स्फोटात कॅफेमधील ग्राहक आणि कर्मचाऱ्यांसह १० लोक जखमी झाले होते. गृह मंत्रालयाने या बॉम्बस्फोटाचा तपास ‘एनआयए’कडे सोपवला आहे. बॉम्बस्फोटानंतर रामेश्वरम कॅफेतील सीसीटीव्ही चित्रीकरणात संशयित दहशतवादी आढळला असून, त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
हा दहशतवादी बॉम्बस्फोट केल्यानंतर बेंगळुरूतून एका सार्वजनिक बसने पसार झाला. तेथून तो तुमकूर आणि बल्लारी येथे गेल्याच्या संशयाने ‘एनआयए’चे अधिकारी आणि कर्नाटक पोलिसांनी दोन्ही ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. त्यानंतर हा दहशतवादी बल्लारीमार्गे गोकर्णपर्यंत गेल्याचे आढळून आले आहे. तेथून तो बसने पुण्यात आल्याचा संशय ‘एनआयए’च्या पथकाने व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच कार्यक्रमाला; नणंद-भावजईच्या गळाभेटीची चर्चा
-‘मनात विचार आला आता भाजपमध्ये जायला पाहिजे का?’; ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवारांचं ट्विट
-१०० रुपये कसले कमी करता, गॅस ४०० रुपयांना द्या; सुप्रिया सुळे मोदी सरकारवर आक्रमक
-‘सत्तेच्या अहंकारामुळे शेळकेंच्या डोक्यात हवा गेली’; राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात तुफान जुंपली
-ब्रेक्रिंग! रोहित पवारांना ईडीचा दणका; बारामती अॅग्रोच्या खरेदीचा कारखाना जप्त