पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे. बारामती मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. सुनेत्रा पवारांची उमेदवारी फक्त अधिकृत घोषणा करणं बाकी असून खासदार शरद पवार यांच्या गटाकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.
एकीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाकडून मतदारसंघ पिंजून काढला जात आहे. सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे आपापल्या प्रचारासाठी सभा घेत आहेत. सभांमधून जोरदार टोलेबाजी करताना दिसतात. त्यातच आता बारामती मतदारसंघात दौरा सुरु असताना सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट झाल्याचं पहायला मिळालं आहे.
बारामतीमधील जळोची येथे महाकालेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यातं होतं. या कार्यक्रमासाठी संयोजकांनी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांना निमंत्रित केलं होतं. शुक्रवारी ८ मार्च रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास प्रथम सुनेत्रा पवार कार्यक्रमस्थळी आल्या. त्यानंतर सुप्रिया सुळे तेथे आल्या. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंनी एकमेकांना पाहताच गळाभेट घेत हसून स्वागत केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘मनात विचार आला आता भाजपमध्ये जायला पाहिजे का?’; ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवारांचं ट्विट
-१०० रुपये कसले कमी करता, गॅस ४०० रुपयांना द्या; सुप्रिया सुळे मोदी सरकारवर आक्रमक
-‘सत्तेच्या अहंकारामुळे शेळकेंच्या डोक्यात हवा गेली’; राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात तुफान जुंपली
-ब्रेक्रिंग! रोहित पवारांना ईडीचा दणका; बारामती अॅग्रोच्या खरेदीचा कारखाना जप्त
-पुण्यात हक्काच्या घराचं स्वप्न आता पुर्ण होणार; म्हाडाच्या ४ हजार ८८२ घरांसाठी लॉटरी जाहीर