पुणे : लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. निवडणूक कोणतीही असो मतदारांना खूष करण्यासाठी त्यांच्या मनात स्थान निर्माण व्हाव यासाठी अनेक राजकीय पक्ष विवध उपक्रम राबवत असतात. सत्ताधारी योजना जाहीर करतात. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला दिनाचे औचित्य साधून घरगुती गॅल सिलेंडरचे दर १०० रुपयांनी स्वस्त केले आहेत. त्यांच्या या घोषणेवर आता बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ताशेरे ओढले आहेत.
“निवडणुका जवळ येत असल्याने अशा प्रकारचे चुनावी जुमले तर जाहीर होणारच. इतकी वर्षे जेव्हा सिलिंडर हजार रुपये होता, महागाईमुळे महिला रडत होत्या, त्यावेळी मोदींना हे का सुचले नाही? हिंमत असेल तर ४०० रुपयांना सिलिंडर करा”, असे थेट आव्हान आता सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारला दिले आहे.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी अनेक विविध विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘सत्तेच्या अहंकारामुळे शेळकेंच्या डोक्यात हवा गेली’; राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात तुफान जुंपली
-ब्रेक्रिंग! रोहित पवारांना ईडीचा दणका; बारामती अॅग्रोच्या खरेदीचा कारखाना जप्त
-पुण्यात हक्काच्या घराचं स्वप्न आता पुर्ण होणार; म्हाडाच्या ४ हजार ८८२ घरांसाठी लॉटरी जाहीर
-लोकसभा निवडणुकीसाठी ‘धकधक गर्ल’ माधुरीला भाजपची ऑफर??; म्हणाली, ‘मी…’