पुणे : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न पाहताय. पण किंमती ऐकून थक्क होताय. घाबरु नका आता तुमचंही पुण्यात हक्काचं घरं होणार. लववकरच पुर्ण होणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील अनुक्रमे ४७५ आणि ५६१ घरांसाठी म्हाडाने सोडत जाहीर केली आहे.
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर, या ५ जिल्ह्यांमधील तब्बल ४ हजार ८८२ घरांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या पुणे मंडळाने सोडत जाहीर केली आहे. या सोडतीसाठी आजपासून (८ मार्च) अर्ज भरता येणार आहेत. म्हाडा कार्यालयात सोडतीचा प्रारंभ म्हाडा पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला.
आज ३ वाजल्यापासून हा म्हाडाचा अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणीची मुदत ८ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत, तर सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत १० एप्रिल रोजी रात्री ११:५९पर्यंत असणार आहे. अर्जाचे ऑनलाइन शुल्क भरण्याची मुदत १२ एप्रिलपर्यंत आहे. म्हाडाचा अर्ज भरण्यासाठी अर्जदारांनी www.mhada.gov.in किंवा https://mhada.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी लागणार आहे तर ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी lottery.mhada.gov.in या संकतेस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.
अर्जदाराची नोंदणी, ONLINE अर्ज भरणे व अर्ज स्वीकृती चे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे ….
- ONLINE अर्जासाठी नोंदणीची सुरवात :- ०७/०३/२०२४ दुपारी ०३ वाजता.
- सोडतीसाठी ONLINE अर्जाची सुरुवात :- ०८/०३/२०२४ दुपारी ०३ वाजता.
- ONLINE पेमेंट स्वीकृती ची सुरुवात दिनांक :- ०८/०३/२०२४ दुपारी ०३ वाजता.
- ONLINE अर्जासाठी नोंदणीचा शेवटचा दिनांक व वेळ :- ०८/०४/२०२४ सायंकाळी ५ वाजे पर्येंत …
- सोडतीसाठी ONLINE अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख व वेळ :- १०/०४/२०२४ रात्री ११:५९ वाजे पर्येंत …
- ONLINE PEMENT अंतिम दिनांक :- १२/०४/२०२४ रात्री ११:५९ पर्येंत.
- बँकेत RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम भरण्याचा अंतिम दिनांक :- १२/०४/२०२४ संबंधित बँकेच्या कार्यालइन वेळे पर्येंत…
- सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी :- २४/०४/२०२४ सायंकाळी ०७:०० वाजता.
- सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी :- ३०/०४/२०२४ सायंकाळी ०७:०० वाजता.
- सोडत दिनांक :- ०८/०५/२०२४ सकाळी १०:०० वाजता.
- सोडतीतील यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडा च्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करणे :- ०८/०५/२०२४ सायंकाळी ०६:०० वाजता.
- सोडतीचे स्थळ :- गृहनिर्माण भवन, आगरकर नगर, म्हाडा कार्यालय पुणे
पुणे शहरात कोठे मिळू शकते घरं?
शिरुर कात्रज, बालेवाडी, धानोरी, येवलेवाडी,फुरसुंगी, मुंढवा, हडपसर, लोहगाव, बालेवाडी, वडगाव शेरी, खराडी, येवलेवाडी, धानोरी, वाघोली
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील घरे
मोशी, चिखली, रावेत, किवळे, पुनावळे, डुडुळगाव, चोविसावाडी, वाकड, मामुर्डी, बोऱ्हाडेवाडी, ताथवळे, मुळशी.
महत्वाच्या बातम्या-
-लोकसभा निवडणुकीसाठी ‘धकधक गर्ल’ माधुरीला भाजपची ऑफर??; म्हणाली, ‘मी…’
-‘विरोध असताना उमेदवारीसाठी मी राष्ट्रवादीत जाणार नाही’; आढळराव पाटलांची स्पष्टोक्ती
-‘शेळकेंचा अहंकार वाढलाय, मावळची जनता त्यांचा अहंकार नक्कीच उतरवणार’; रोहित पवारांची प्रतिक्रिया
-पुणे-सुरत प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; पुणे-सुरत थेट विमानसेवा लवकरच सुरु होणार