पुणे : बॉलीवूड क्षेत्रातील ‘धकधक गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दिक्षित आपल्या सौदर्यांने आजही सर्वांना घायाळ करते. पिंपरी-चिंचवडमधील निगडीतील पीएनजी ज्वेलर्स नवीन दालानाच्या उद्घाटन माधुरी दिक्षितच्या हस्ते झाले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना माधुरीने लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने ऑफर दिली आहे का याबाबत सस्पेन्स ठेवला आहे.
गेल्या काही दिवसांपासून माधुरी दीक्षित भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु आहेत. कला क्षेत्र गाजवल्यानंतर आता राजकारणात येण्याची इच्छा आहे का?, असे विचारले असता “याबाबत मला खूपवेळा विचारले जाते. मी एक कलाकार आहे. कला हे माझे क्षेत्र आहे. त्यात मला रस आहे. राजकारण माझे क्षेत्र नाही”, माधुरी दीक्षित म्हणाली आहे.
लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी भाजपकडून ऑफर आहे का? यावर बोलताना ‘मी ते तुम्हाला का सांगू’ असं म्हणत माधुरी दीक्षितने लोकसभा निवडणूक लढविण्याबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘विरोध असताना उमेदवारीसाठी मी राष्ट्रवादीत जाणार नाही’; आढळराव पाटलांची स्पष्टोक्ती
-‘शेळकेंचा अहंकार वाढलाय, मावळची जनता त्यांचा अहंकार नक्कीच उतरवणार’; रोहित पवारांची प्रतिक्रिया
-पुणे-सुरत प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; पुणे-सुरत थेट विमानसेवा लवकरच सुरु होणार
-जागतिक महिला दिनानिमित्त पुण्यात बससेवा मोफत; पीएमपीएमएलकडून खास गिफ्ट
-‘आम्ही राजकारणात हिशोब करायला आलो नाही’; अमित शहांच्या त्या टीकेवर सुळेंची प्रतिक्रिया