पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांनी आमदार सुनील शेळके यांनी शरद पवारांच्या मेळाव्याला येण्यापासून रोखत दमदाटी केली, अशी तक्रार काही कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे केली होती. यावरुन शरद पवारांनी मेळाव्यात सुनील शेळके यांना चांगलंच सुनावलं आहे. त्यावर आता आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जे काही आमदार आहेत त्यांचे जे नेते तेच जर गुंडांना घेऊन बसत असतील, गुंडांसोबत फोटो काढत असतील, त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन रील्स करत असतील, सीपींचं ऐकत नसतील तर सत्तेत असणाऱ्या आमदारांना अहंकार येऊ शकतो. आणि तोच कदाचित सुनील भाऊ शेळके यांच्या बाबतीत आलेला आहे.
ते बोलत असताना जाधव तुम्ही जर मावळच्या बाबतीत बोलला तर एक पवित्र भूमी मावळ म्हणजे मावळा मावळा म्हटलं की आपण एक स्वाभिमान तिथे असणारा प्रत्येक नागरिक हा स्वाभिमानी आहे. आणि स्वाभिमानी नागरिकांना एवढा अहंकार शोभणारा नाही. तुम्ही आता आमदार झाला आहात आणि आता तुम्ही इतक्या खालच्या लेवलला जाऊन साहेबांबद्दल बोलत असाल तर तिथली जनता हे सहन करणार नाहीत, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे-सुरत प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; पुणे-सुरत थेट विमानसेवा लवकरच सुरु होणार
-जागतिक महिला दिनानिमित्त पुण्यात बससेवा मोफत; पीएमपीएमएलकडून खास गिफ्ट
-‘आम्ही राजकारणात हिशोब करायला आलो नाही’; अमित शहांच्या त्या टीकेवर सुळेंची प्रतिक्रिया
-‘आम्ही शिंदे गटाइतक्याच जागा लढणार’; भुजबळांच्या मागणीवर फडणवीसांचं उत्तर म्हणाले ‘कोणी काहीही…’