पुणे : आज जागतिक महिला दिनानिमित्त पुणे पीएमपीएमएलकडून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील महिलांना विशेष गिफ्ट मिळालं आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील काही मार्गांवर महिलांना मोफत बससेवा देण्यात येणार आहे. आजच्या दिवशी शहरातील १७ मार्गांवर दिवसभर ही मोफत सेवा दिली जाणार आहे, महिलांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पीएमपीला पिंपरी-चिंचवड शहरातुन मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. एकूण महसुलापैकी निम्म्याहून अधिक महसूल या परिसराचा असतो. आकुर्डी ते मनपा भवन , मार्केट यार्ड ते पिंपळे गुरव, निगडी ते मेगा पॉलिस हिंजवडी आणि भोसरी ते निगडी आणि चिखली ते डांगे चौक मात्र, महिलांसाठी केवळ चारच मार्गावर ही सेवा धावत आहे. त्यामुळे आणखी मार्ग वाढवावेत, अशी ही मागणी महिला प्रवाशांनी केली आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडसाठी फक्त ५ मार्गावर ही सेवा असल्याने या परिसरातील महिला प्रवासांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शनिवारवाडा ते केशवनगर मुंढवा (१६९), कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन (९४), एनडीए गेट क्र.१० ते मनपा (८२), कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड (२४), मार्केटयार्ड ते पिंपळेगुरव (११), हडपसर ते वारजे माळवाडी (६४), भेकराईनगर ते मनपा (१११), हडपसर ते वाघोली (१६७), अप्पर डेपो ते शिवाजीनगर (१३),आकुर्डी रेल्वे स्टेशन ते मनपा (३२२), निगडी ते मेगा पॉलीस हिंजवडी (३७२), भोसरी ते निगडी (३६७), चिखली ते डांगे चौक (३५५) यासह पुण्यातील स्वारगेट ते हडपसर (३०१), स्वारगेट ते धायरेश्वर मंदिर (११७), कात्रज ते कोथरूड डेपो (१०३) या बसने प्रवास करणाऱ्या सर्व महिलांना आज बससेवा मोफत मिळणार आहे. या सेवेचा सर्व महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन पीएमपीएलएम कडून करण्यात आले आहे.
दरम्यान, आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा म्हणून आज महिला दिनाचे औचित्य साधून पीएमपीएलने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील १७ विशेष बसमधून महिलांना मोफत सेवा देण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘आम्ही राजकारणात हिशोब करायला आलो नाही’; अमित शहांच्या त्या टीकेवर सुळेंची प्रतिक्रिया
-‘आम्ही शिंदे गटाइतक्याच जागा लढणार’; भुजबळांच्या मागणीवर फडणवीसांचं उत्तर म्हणाले ‘कोणी काहीही…’
-पुणे मतदारसंघात ओबीसींची संख्या जास्त; राजकीय समीकरणं बदलणार!
-आयटी कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेची महत्वाची घोषणा; भाडेतत्त्वाने घर देण्याचा प्रकल्प उभारणार