पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप टीका-टिपण्णी करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात बैठका आणि सभा घेतल्या. या महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवारांवर निशाणा साधला.
‘पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळातील १० वर्षांच्या कामाचा हिशेब विरोधकांकडून मागितला जातो. पण मी शरद पवारांना सांगू इच्छितो की, महाराष्ट्राची जनता गेल्या ५० वर्षांपासून तुमचा भार वाहत आहे’, असं अमित शहा म्हणाले. अमित शहांच्या या टीकेला आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘मी अमित शहांचे धन्यवाद मानते कारण त्यांनी यावेळी आमच्यावर कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप केले नाहीत. आतापर्यंत त्यांनी ज्यावेळी महाराष्ट्रात दौरा केला आहे. त्यावेळी त्यांनी एनसीपी म्हणजे नॅशनल करप्ट पार्टी म्हटलं आहे. मात्र त्यांनी यावेळी असे कोणतेही आरोप केले नाहीत. आम्ही राजकारणात हिशोब करायला आलो नाही ५५ वर्ष जर महाराष्ट्र जनतेने साहेबांना प्रेम दिलं आहे तर त्यांच्या प्रश्नांचं उत्तर त्यातच आहे’, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अमित शहांना सुनावलं आहे.
‘आम्ही राजकारणात हिशोब करायला आलो नाही. यावेळी अमित शहांनी आमच्यावर आता परिवार वादाचे आरोप केले जातात. परिवार वादावरुन आरोप केले त्यामुळे धन्यवाद, त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप यावेळी केले नाहीत. भाजपमध्येही अनेक राजकीय परिवार आहेत आणि मी आहेच परिवारवाद, असं सुप्रिया सुळे यांनी खडसावून सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘आम्ही शिंदे गटाइतक्याच जागा लढणार’; भुजबळांच्या मागणीवर फडणवीसांचं उत्तर म्हणाले ‘कोणी काहीही…’
-पुणे मतदारसंघात ओबीसींची संख्या जास्त; राजकीय समीकरणं बदलणार!
-आयटी कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेची महत्वाची घोषणा; भाडेतत्त्वाने घर देण्याचा प्रकल्प उभारणार
-‘त्यांच्याबद्दल आजही आदरच, पण…’; शरद पवारांच्या टीकेला सुनील शेळकेंचं उत्तर